Karan Johar to get the first sex experience! | पहिला सेक्सुअल अनुभव घेण्यासाठी करण जोहरला द्यावे लागले पैसे!

निर्माता तथा दिग्दर्शक करण जोहर हे व्यक्तिमत्त्व सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये वादग्रस्त राहिले आहे. भलेही बॉलिवूडमध्ये सध्या करण दिग्दर्शक, निर्माता, फॅशन स्टायलिस्ट आणि ट्रेंड सेंटर बनला आहे; परंतु त्याच्या सेक्स, रिलेशन्स आणि दोस्तीमुळे तो नेहमीच वादाच्या भोवºयात सापडला आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या त्याच्या आॅटोबायोग्राफीमधून त्याच्या आयुष्यातील अनेक रहस्य उघड झाले. त्यात अतिशय बिनधास्तपणे त्याच्या आयुष्याचा उलगडा करण्यात आला आहे. फिल्मी करिअरपासून ते सेक्स लाइफवर अतिशय उघडपणे त्यात भाष्य केले आहे. त्यातीलच एक करणच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

करण जोहरच्या ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ या आॅटोबायोग्राफीमध्ये करणच्या पहिल्या सेक्सुअल अनुभवाविषयी उघडपणे सांगण्यात आले आहे. वयाच्या २६व्या वर्षी करणने पहिला सेक्सुअल अनुभव घेतला होता. यासाठी त्याला पैसेही चुकवावे लागले. अमेरिकेच्या न्यू यॉर्कमध्ये त्याने त्याची व्हर्जिनिटी गमावली. हा अनुभव त्याला खूपच त्रस्त करणारा होता. करणने याअगोदर हा अनुभव अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या पोडकास्ट (नॉट फिल्टर नेहा) या शोमध्येही सांगितला होता. 

करणने त्याच्या आॅटोबायोग्राफीमध्ये लिहिले की, ‘सेक्सुअल अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा जेव्हा मी पैसे दिले होते तेव्हा मी काहीच केले नव्हते. एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा तो अनुभव घेण्यासाठी मी गेलो होतो. मात्र यामुळे मला फारसा चांगला अनुभव आला नाही. मला हा सर्व प्रकार मुर्खपणाचा वाटला. शिवाय बनावटही वाटला. कारण समोरचा व्यक्ती आपल्यासोबत बनावट पद्धतीनेच वेळ व्यतित करीत असतो. 

दरम्यान, करणच्या या खुलाशानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ निर्माण झाली होती. वास्तविक करणचे नाव अभिनेत्रीऐवजी अभिनेत्यांबरोबरच अधिक जोडले गेले. सध्या करण दोन मुलांचा बाप आहे. सरोगसी पद्धतीने त्याला दोन मुले झाले असून, त्यांचा फोटो त्याने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 
Web Title: Karan Johar to get the first sex experience!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.