Karan Johar and Rohit Shetty's 'India's Next Superstar' debate! Read, Polly News !! | ​करण जोहर अन् रोहित शेट्टीचा ‘इंडिया का अगला सुपरस्टार’ वादात! वाचा,पोलखोल बातमी!!

करण जोहर आणि रोहित शेट्टी यांचा ‘इंडिया का अगला सुपरस्टार’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या भलताच चर्चेत आहे. होय, शो सुरु होऊन काही दिवस होत नाही, तोच हा शो वादात सापडला आहे. अलीकडे या शोबद्दल असा काही खुलासा झाला की, सगळीकडे खळबळ माजली.
करण व रोहितच्या या शोसाठी १० तरूण तरूणींचे दोन वेगवेगळे ग्रूप बनवण्यात आले आहेत. या दोन्ही ग्रूपला रोज एक टास्क दिला जाईल आणि सरतेशेवटी केवळ एकच मुलगा व मुलगी फाईनलपर्यंत पोहोचून हा शो जिंकतील. हा शो जिंकणाºया जोडीला करणच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीसोबत तीन चित्रपट करण्याची संधी मिळेल. या शोमधील स्पर्धकाचा कुठलाही वशिला नाही, कुठलीही शिफारस नाही, असा प्रचार केला जात आहे. केवळ टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडचे नवे सुपस्टार या शोमधून निवडल्या जातील, असाही दावा केला जात आहे. सगळे स्पर्धक नवखे आहेत, त्यांचा आत्तापर्यंत बॉलिवूडशी कुठलाही संबंध नाही, असेही सांगितले जात आहे. पण सत्य काही वेगळेच आहे. होय, या शोमधील एक स्पर्धक एक नाही, दोन नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्ससोब काम करून चुकली आहे. तिचे नाव आहे एंजेला क्रिस्लिंज्की.ALSO READ : OMG! ​कंगना राणौतने पुन्हा डिवचले; म्हणे, ‘करण जोहर मेहमानों को जहर पिलाता है, मुझसे पुछो ’!!

एंजेलाने हृतिक रोशनसोबत दोन जाहिराती केल्या आहे. शाहरूख खानसोबतही ती एका टीव्ही कमर्शिअलमध्ये दिसली आहे. शाहरूखसोबतचा फोटो तर तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सुशांत सिंग राजपूतसोबतही तिने एक जाहिरात केली आहे. इरफान खानसोबतही ती दिसली आहे. केवळ जाहिरातीचं नाही तर साऊथच्या चित्रपटांमध्येही एंजेला दिसली आहे. बॉलिवूडच्या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. होय, अगदी अलीकडे रिलीज झालेल्या विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२१’मध्ये एंजेला निगेटीव्ह रोलमध्ये दिसली होती. याशिवाय सैफ अली खानच्या ‘कालाकांडी’ यातही तिची छोटीशी भूमिका होती.
एकंदर काय तर करण व रोहितने या शोबद्दल केलेले दावे सध्या तरी पोकळ वाटताहेत. पुढे या शोमध्ये काय घडते, ते बघूच.
Web Title: Karan Johar and Rohit Shetty's 'India's Next Superstar' debate! Read, Polly News !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.