मतभेद संपलेत! अजय देवगण व करण जोहर पुन्हा मित्र!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 11:25 AM2018-11-02T11:25:15+5:302018-11-02T11:26:02+5:30

सणासुदीच्या दिवसांत लोक मनातील कटुता विसरून जवळ येत नव्या नात्याची सुरुवात करतात. अजय देवगण आणि करण जोहर यांच्याबद्दलही काहीसे असेच म्हणता येईल.

Karan Johar and Ajay Devgn finally bury the hatchet | मतभेद संपलेत! अजय देवगण व करण जोहर पुन्हा मित्र!! 

मतभेद संपलेत! अजय देवगण व करण जोहर पुन्हा मित्र!! 

googlenewsNext

सणासुदीच्या दिवसांत लोक मनातील कटुता विसरून जवळ येत नव्या नात्याची सुरुवात करतात. अजय देवगण आणि करण जोहर यांच्याबद्दलही काहीसे असेच म्हणता येईल. होय, २०१६ मध्ये अजय व करण यांच्यात मतभेद निर्माण झालेत आणि पुढे सगळेच बदलले. या मतभेदांना कारण ठरले ते त्यांचे चित्रपट. करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजयचा ‘शिवाय’ दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर एकाचवेळी प्रदर्शित होणार होते. या रिलीजवरून दोघांत वाद झाला. बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठी दोघांनीही आपआपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यास नकार दिला. चित्रपटाच्या बिझनेसवरही याचा परिणाम झाला. अजय व करणच्या या भांडणात करण व काजोलची मैत्रीही तुटेपर्यंत ताणली गेली. इतकी की, आता माझ्यात व काजोलमध्ये कुठलीही मैत्री नाही, असे करणने जाहिर करून टाकले. कालांतराने करण व काजोलमधील मतभेद मिटलेत आणि आता करण व अजयमधील मतभेदही संपले आहेत. होय, जवळपास दोन वर्षे एकमेकांपासून दूर राहणाºया अजय व करणची मैत्री पुन्हा बहरू लागली आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी यशराज स्टुडिओत दोघांनाही एकत्र सिगारेट पिताना पाहिले गेले. त्याचक्षणी या दोघांची मैत्रीची गाडी पुन्हा एकदा रूळावर आल्याचे मानले गेले होते. ताजी खबर खरी मानाल तर या दोघांमध्ये सगळे काही ‘आॅल इज वेल’ होण्यामागे काजोल कारणीभूत आहे.  काजोल, करण व शाहरूख हे तिघेही जीवलग मित्र आहेत. त्यामुळे मध्यंतरी काही काळ दुरावा निर्माण झाला तरी करण व काजोल फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकले नाही. आता तर काजोलने पती अजयच्या मनातील करणबद्दलची कटुताही दूर केली आहे. आता ही मैत्री अशीच कायम राहावी, अशी कामना करूया. करण व अजयने ‘काल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले होते या हॉरर चित्रपटानंतर दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसतील, अशीही आशा करूयात.

 

Web Title: Karan Johar and Ajay Devgn finally bury the hatchet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.