करण-अर्जुन फिर से आयेंगे...! संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमात झळकणार ही जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 02:29 PM2019-02-01T14:29:31+5:302019-02-01T14:30:17+5:30

बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान व सलमान खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. हे दोघे संजय लीला भन्साळींच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

Karan-Arjun will come again ...! The duo will be seen in Sanjay Leela Bhansali's upcoming movie | करण-अर्जुन फिर से आयेंगे...! संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमात झळकणार ही जोडी

करण-अर्जुन फिर से आयेंगे...! संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमात झळकणार ही जोडी

googlenewsNext

बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान व सलमान खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. हे दोघे संजय लीला भन्साळींच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा करण अर्जुन ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील भन्साळी यांनी या कलाकारांसोबत वेगवेगळ्या सिनेमात काम केलेले आहे. मात्र यावेळे सलमान व शाहरूखला एकत्र आणण्याची तयारी भन्साळी करत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी लवकरच आगामी चित्रपट घेऊन येणार आहेत. या सिनेमात ते बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरूख खान व सलमान खान यांना रुपेरी पडद्यावर एकत्र आणणार आहे. सलमान खान व शाहरूख खानने एकत्र करण अर्जुन चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगला लक्षात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी लवकरच या चित्रपटाबाबतची घोषणा करणार आहेत.


भन्साळींनी सलमान खान सोबत हम दिल दे चुके सनम चित्रपटात निर्माता म्हणून काम केले आहे आणि शाहरूखसोबत देवदास चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. हे दोन्ही सिनेमांना रसिकांनी खूप दाद दिली होती. भन्साळी सलमान व शाहरूख या जोडीसोबत रुपेरी पडद्यावर धमाल करतील, अशी आशा आहे. शाहरूख खान व सलमान खानबाबत बोलायचे झाले तर त्या दोघांनी करण अर्जुन, कुछ कुछ होता है व हम तुम्हारे है सनम या चित्रपटात एकत्र दिसले होते. याशिवाय सलमानच्या ट्युबलाइट चित्रपटात शाहरूखने केमिओ केला होता.

Web Title: Karan-Arjun will come again ...! The duo will be seen in Sanjay Leela Bhansali's upcoming movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.