Kapil Sharma's return to Sohail Khan's film | सोहेल खानने शब्द पाळलाचं तर ‘या’ चित्रपटातून होऊ शकते कपिल शर्माची वापसी!

कपिल शर्मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब होता. काल-परवा तो ट्विटरवर उगवला आणि आपण पुन्हा एकदा नव्या शोसह परतणार असल्याचे त्याने सांगितले. अर्थात हा नवा शो काय, कुठला, हे त्याने सांगितले नाही. आता कपिलचा हा नवा शो कुठला, हे आम्हाला ठाऊक नाही. पण कपिल एका चित्रपटात दिसणार, याचे संकेत मात्र मिळताहेत.  कदाचित येत्या काळात सलमान खानचा आधार कपिलला मिळू शकतो़. होय, आम्ही बोलतोय ते सलमानचा आगामी चित्रपट ‘शेर खान’बद्दल. अलीकडे ‘रेस3’च्या प्रमोशनदरम्यान सलमानने ‘शेर खान’ची वाच्यता केली. येत्या दिवसांत तू कुठल्या चित्रपटांत दिसशील, असा प्रश्न सलमानला केला गेला होता. यावेळी ‘भारत’, ‘दबंग3’,‘किक2’ शिवाय ‘शेर खान’ अशी यादी सलमानने वाचली. यातील ‘शेर खान’चे नाव ऐकताच सगळ्यांचे कान टवकारले. हा चित्रपट सलमानचा भाऊ सोहेल खान करणार होता. हा तोच चित्रपट आहे, ज्यासाठी सोहेल खानने कपिलला वचन दिले होते.
होय, कपिल ‘कॉमेडी सर्कस’मध्ये झळकत असताना सोहेल या शोचा जज होता. याचदरम्यान सोहेलने कपिलला ‘शेर खान’मध्ये तुला घेणार, असे वचन दिले होते. यानंतर या चित्रपटाबद्दलचे कुठलेच अपडेट बाहेर आले नाही. पण आता इतक्या वर्षांनंतर सलमानने हा चित्रपट पाईनलाईनमध्ये असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सोहेल आपले वचन विसरला नसल्यास कपिलचे भाग्य फळफळण्याची चिन्हे आहेत. कपिललाही आपल्या कमबॅकसाठी एका संधीची गरज आहे. अशात कपिलच्या हाती हा चित्रपट लागलाच तर ती त्याच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. कपिलच्या करिअरची बुडती नौका या चित्रपटामुळे वाचू शकते़ आता पुढे काय होतेय, ते बघूच.

ALSO READ : दोन महिन्यांपासून कुठे गायब होता कपिल शर्मा? जाणून घ्यायचे असेल तर वाचा बातमी!!

गतवर्षी सुनील ग्रोव्हर सोबत केलेल्या वादामुळे कपिल शर्मा वादात अडकला होता. यानंतर अनेक कलाकारांना कपिलने सेटवर वाट पाहायला लावली आणि शूटिंग केल्याशिवायच या कलाकारांना परतावे लागले. त्याच दरम्यान कपिल डिप्रेशनमध्ये सुद्धा गेल्या होता.   
Web Title: Kapil Sharma's return to Sohail Khan's film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.