Kapil Sharma's fans good news! Soon the audience's meeting | कपिल शर्माच्या फॅन्ससाठी खुशखबर ! लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतेच कपिलने सोशल मीडियावरच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना आपली खुशाली कळवली आणि त्याचबरोबर त्याने आपला आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दलसुद्धा त्यांच्या फॅन्सना सांगितले. लवकरच तो आपला आगामी चित्रपट फिरंगीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. यावेळी त्यांने आपल्या फॅन्सच्या अनेक प्रश्नांची उत्तर देखील दिली. तसेच त्यांने हे देखील कबुल केले की आगामी चित्रपट तो गाणेसुद्धा गाणार आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव ढींगरा करतो आहे. या चित्रपटात कपिलसोबत इशिया दत्त आणि मोनिका गिलसुद्धा झलकणार आहेत. येत्या १० नोव्हेंबरला  हा चित्रपट रिलीज होणारा आहे. त्यात कपिल शर्मा एक छोट्या शहरातील मुलच्या भूमिकेत दिसणार आहे. जो एका एनआरआय मुलीच्या प्रेमात पडतो. यात त्याच्या अपोझिट मोनिका गिल दिसणार आहे. तर इशिताची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. 

ALSO READ  :  OMG! ​कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी दोन बातम्या! एक चांगली अन् एक वाईट!!

कपिल शर्मा नुकताच बंगळुरुवरून उपचार करून परतला आहे. जेव्हापासून तो परत आला आहे तेव्हापासून प्रेक्षक कपिल शर्माच्या शोची सुरुवात करतोय याची वाट पाहत आहेत. त्याच्या एक जवळच्या मित्रांने एक पेपरला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, कपिल पूर्ण बरा झाल्यानंतर शो ला सुरुवात करणार आहे.  गेल्या तीन महिन्यांपासून अनेकवेळा तब्येत बिघडल्यामुळे शाहरुख खानपासून अनिल कपूरपर्यंत अनेकांना शूट केल्याशिवायच सेटवरुन परतावे लागले होते. कपिल डिप्रेशनमध्ये गेल्याचे त्याच्या नकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्यानंतर 45 दिवस उपचार घेण्यासाठी बंगळुरुला गेला होता. मात्र जवळपास 15 दिवस उपचार घेऊन तो परता आहे आणि  सध्या कपिल त्याच्या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. कपिल शर्माचा शो जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. कपिल शर्मा आणि त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथ या दोघांचे ब्रेकअप झाल्याची ही मध्यतंरी चर्चा होती. मात्र कपिलचा हा जवळचा मित्र म्हणजे, दिनेश कुमार. गिन्नी व कपिलच्या ब्रेकअपची बातमी शुद्ध बकवास असल्याचे  त्याचे म्हणणे आहे. ‘असे काहीही नाही. कपिल आणि गिन्नी सोबत आहे आणि त्यांचे रिलेशन एकदम पक्के आहे.   
Web Title: Kapil Sharma's fans good news! Soon the audience's meeting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.