Kapil Sharma plans 'Plan B' to retain his career Read, detailed !! | ​करिअर सावरण्यासाठी कपिल शर्माने तयार केला ‘प्लान बी’! वाचा, सविस्तर!!

कॉमेडी किंग कपिल शर्माचा अलीकडे आलेला ‘फिरंगी’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. यामुळे कपिल डिप्रेशनमध्ये गेल्याचेही ऐकिवात आले. पण आताश: यातून  बाहेर पडण्यासाठी कपिल सज्ज झाला आहे. होय, करिअरची डुबती नौका सावरण्यासाठी कपिलने बी प्लान तयार केला असल्याची खबर आहे. चर्चा खरी मानाल तर, कॉमेडी करून लोकांना हसवल्यानंतर आता कपिल एक गेम शो घेऊन येण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, कॉमेडीशिवाय वेगळ्या प्रांतात हात आजमावून पाहण्याची कपिलची इच्छा आहे. अलीकडे यासंदर्भात त्याने सोनी टीव्हीच्या टीमची भेट घेतल्याचेही कळते. या भेटीत कपिलने म्हणे एका गेम शोची संकल्पना मांडली. कपिल त्याची अतिशय जवळची मैत्रिण निकुंज मलिकसोबत हा गेम शो करू इच्छितो. (होय, राहुल महाजनच्या स्वयंवरमध्ये दिसलेली तीच ती निकुंज मलिक़) कपिलची ही संकल्पना चॅनलला किती आवडली, हे अद्याप कळलेले नाही. पण चॅनलला ती आवडलीच आणि त्यानुसार कपिल नवा कोरा गेम शो घेऊन आलाच तर प्रेक्षकांना तो किती आवडेल, हे तूर्तास सांगता येणार नाही. कारण प्रेक्षकांनी नेहमीच कपिलला कॉमेडीयन म्हणून पाहणेच पसंत केले आहे. अशात कपिलचा हा प्लान बी किती यशस्वी ठरतो, ते काळच सांगेल. सध्या आपण केवळ कपिलला याकामी शुभेच्छा देऊ यात.

ALSO READ :  ​काय ‘ज्युनिअर अरोरा साहब’ बनून टीव्ही पतरण्यास सज्ज आहे कपिल शर्मा?

या नव्या वर्षात कपिल त्याचा कॉमेडी शो घेऊन येणार, अशीही खबर आहे.  अर्थात अद्याप कपिलने याबद्दल आणि आपल्या कमबॅक शोबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. सूत्रांचे मानाल तर कपिलच्या या कमबॅक शोमध्ये त्याचे अनेक जुने सहकलाकारही त्याच्यासोबत दिसतील. ही बातमी खरी असेल तर कपिलसोबत सुनील ग्रोव्हर परततो का, हे पाहणेही इंटरेस्टिंग ठरणार आहे. गतवर्षभरात कपिलच्या करिअरची गाडी रूळावर घसरली आहे. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला होता. सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला होता. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला  आजारपणाने  घेरले होते. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले होते.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला होता.
Web Title: Kapil Sharma plans 'Plan B' to retain his career Read, detailed !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.