'या' सिनेमातून कपिल देवच्या मुलीची बॉलिवूडमध्ये होणार एन्ट्री, रणवीर सिंगची यात मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:29 PM2019-03-26T12:29:20+5:302019-03-26T12:33:57+5:30

'८३'च्या  भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा सिनेमा दिग्दर्शक कबीर खान घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

kapil dev daughter amiya turns assistant director for ranveer singh 83 | 'या' सिनेमातून कपिल देवच्या मुलीची बॉलिवूडमध्ये होणार एन्ट्री, रणवीर सिंगची यात मुख्य भूमिका

'या' सिनेमातून कपिल देवच्या मुलीची बॉलिवूडमध्ये होणार एन्ट्री, रणवीर सिंगची यात मुख्य भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देया सिनेमाच्या निमित्ताने कपिल देव यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेयहा सिनेमा १० एप्रिल, २०२०ला रिलीज होणार आहे

'८३'च्या  भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा सिनेमा दिग्दर्शक कबीर खान घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंगकपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. कबीर खानने सिनेमाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत. या सिनेमाशी संबंधीत एक इंटरेस्टिंग बातमी समोर येतेय. या सिनेमाच्या निमित्ताने कपिल देव यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. 23 वर्षीय आमिया या सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे.     


या सिनेमात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता साकारणार आहे. तर साहिल खट्टर  माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. तसेच सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत ताहिर भसीन दिसणार आहे. 




सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये क्रिकेटर्स सिनेमातील कलाकारांना क्रिकेट शिकवणार आहे. यानंतर '८३'ची टीम शूटिंग करिता लंडनसाठी 15 मे रोजी रवाना होणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  
 

Web Title: kapil dev daughter amiya turns assistant director for ranveer singh 83

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.