Kangna Ranaut's 'debut' and 'Teju' prolong! Read the whole news !! | ​कंगना राणौतचा ‘डेब्यू’ अन् ‘तेजू’ लांबणीवर! वाचा संपूर्ण बातमी!!

कंगना राणौत दिग्दर्शिका बनणार, ही बातमी फार पूर्वीच आम्ही तुम्हाला दिली होती. त्यानंतर ‘तेजू’ हा कंगनाने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा असेल, अशी बातमी आली होती. या चित्रपटात कंगना स्वत: ८० वर्षांच्या म्हातारीची भूमिका साकारणार, अशीही माहिती होती. साहजिक कंगनाचे चाहते यामुळे हरकले होते. कंगनाने दिग्दर्शित केलेला सिनेमा आणि त्यातही तिची ८० वर्षांच्या म्हातारीची भूमिका असे सगळे पाहण्यास चाहते उत्सूक होते. पण आता ही उत्सुकता प्रतिक्षेत बदलणार आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर कंगनाचा दिग्दर्शन क्षेत्रातील डेब्यू लांबला आहे.
यावर्षी डिसेंबरमध्ये कंगनाच्या या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार होते. पण आता ते पुढील वर्षीपर्यंत लांबणीवर पडले आहे. निर्माता शैलेश आर सिंग यांनी ‘मिड डे’शी बोलताना ही माहिती दिली आहे. कंगनाचा प्रोजेक्ट यावर्षी चालू होऊ शकणार नाही. कारण जानेवारी २०१८ पर्यंत ती ‘मणिकर्णिका’मध्ये बिझी आहे. हा चित्रपट हातावेगळा केल्यानंतर कंगना ‘तेजू’ची तयारी करणार आहे. जानेवारीनंतरचे सहा ते आठ महिने कंगना ‘तेजू’साठीच्या तयारीत घालवणार आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील अतिशय आव्हानात्मक आणि महागडा सिनेमा असेल. काही इंटरनॅशनल टेक्निशिअन्सची मदत यासाठी घेतली जाणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर वेळ घालवणे बनतेच, असे सिंग म्हणाले.

ALSO READ: अखेर हृतिक रोशन बोलला! कंगना राणौतच्या आरोपांना दिले ‘आॅफिशिअल’ उत्तर!!

‘तेजू’च्या स्टोरीबद्दल सांगायचे तर सूत्रांच्या मते, कथा एकदम इंटरेस्टिंग आहे. ८० वर्षांच्या एका म्हातारीला मरायचे नसते. त्यामुळे पुन्हा जिवंत होण्यासाठी ती आपल्या सुपरपॉवरचा वापर करते, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जाणार आहे. शिवाय लहान मुलांना समोर ठेवून तो साकारला जाणार आहे. या चित्रपटासाठी ५० कोटींचे बजेट ठेवण्यात आल्याचे कळते. कारण यात अनेक व्हीएफएक्स इफेक्ट्स असणार आहेत. शिवाय कंगना यात एका आगळ्यावेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. आता कंगनाचा चित्रपट म्हटल्यावर इतकी प्रतीक्षा तर करायलाच हवी ना?

Web Title: Kangna Ranaut's 'debut' and 'Teju' prolong! Read the whole news !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.