Kangna Ranaut's anger over 'Godfather', 'Tamale' will be 'Sweet'! | कंगना राणौतचा ‘गॉडफादर’वरचा राग निवळला, ‘इमली’ होणार ‘गोड’!
कंगना राणौतचा ‘गॉडफादर’वरचा राग निवळला, ‘इमली’ होणार ‘गोड’!
दिग्दर्शक अनुराग बासूला अभिनेत्री कंगना राणौत तिचा गॉडफादर मानते. २००६ मध्ये अनुरागनेचं कंगनाला ब्रेक दिला होता.  ‘गँगस्टर’ चित्रपटातून त्याने कंगनाला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते.  यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २००७ मध्ये अनुराग व कंगना यांनी पुन्हा एकत्र काम केले होते. ‘लाइफ इन ए मेट्रो’ या अनुरागच्या चित्रपटात कंगना होती.  पुढे २०१० मध्ये अनुराग दिग्दर्शित ‘काईट्स’ या चित्रपटातही कंगना होती. पण या चित्रपटाने कंगना व अनुरागच्या नात्यात दुरावा निर्माण केला होता. या चित्रपटात कंगनाच्या अपोझिट ऋतिक रोशन होता. शिवाय अभिनेत्री बारबरा मोरी हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.   नेमकी ही बारबराचं कंगनाला खटकली होती. या चित्रपटात बारबराला नको इतके हायलाईट केले गेले, असा आक्षेप कंगनाने नोंदवला होता आणि यामुळे अनुराग नाराज झाला होता. कंगनाही अनुरागवर प्रचंड नाराज होती. पण ही नाराजी कदाचित दूर झाली आहे.होय, आठ वर्षांपुर्वी दिसलेली ही जोडी चौथ्या चित्रपटात एकत्र काम करण्यास सज्ज झाली आहे. होय, अनुरागचा आगामी चित्रपट ‘इमली’मध्ये कंगनाची वर्णी लागली आहे. आॅगस्टमध्ये  चित्रपटाचे प्री शूट सुरु होईल आणि याचवर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोरवर येईल, असे कळतेय. तूर्तास या चित्रपटाचा मेल अ‍ॅक्टर अजून फायनल झालेला नाही.
 तूर्तास ‘इमली’बद्दल बोलण्यास कंगनाने नकार दिला आहे. सध्या या चित्रपटाबद्दल काही सांगणे खुप घाईचे होईल. हा चित्रपट या वर्षांच्या शेवटी सुरु होईल. मी एवढेच म्हणून शकते की, अनुराग माझे गॉडफादर आहेत. मी आज जे काही आहे, त्यांच्यामुळे आहेत. मी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्याची वाट पाहू शकत नाही, केवळ इतकेच ती बोलली.
  तूर्तास कंगना ‘मणिकर्णिक’ आणि ‘मेंटल है क्या’ या दोन चित्रपटांत बिझी आहे. यानंतर अश्विनी अय्यर यांच्या तिवारीच्या कब्बडीवर तयार होणा-या चित्रपटातही कंगना दिसणार आहे. सध्या यासाठी कंगना योग  आणि कबड्डीचे ट्रेनिंग घेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अक्टोबर मध्ये सुरु होईल. या चित्रपटाचेशूटिंग संपल्यानंतर ‘इमली’चे शूटिंग सुरु होईल.

ALSO READ :  म्हणून 'मणिकर्णिका'साठी कंगणा राणौतने घेतले इतके कोटींचे मानधन
  
Web Title: Kangna Ranaut's anger over 'Godfather', 'Tamale' will be 'Sweet'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.