Kangna Ranaut reached the Bollywood party for the first time! Because you know too !! | ​पहिल्यांदा बॉलिवूड पार्टीमध्ये पोहोचली कंगना राणौत! तुम्हीही जाणून घ्या कारण!!

कंगना राणौत कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात दिसत नाही. तशीच ती कुठल्याही पार्टीमध्येही दिसत नाही. यामागचे कारण कंगनाने वेळोवेळी सांगितले आहे. कंगनाला बॉलिवूडचे   पुरस्कार सोहळे आणि झगमगत्या पार्ट्या सगळे काही फेक वाटते. होय, बॉलिवूडचे पुरस्कार सोहळे तर इथूनतिथून सगळेच बोगस असतात, असे कंगना अगदी दाव्यानिशी सांगते. पण शेवटी बॉलिवूडमध्ये राहायचे तर काही अपवादात्मक गोष्टी कराव्या लागतातच. कधी कधी अपरिहार्यपणे किंवा कधीकधी व्यावसायिक कारणांमुळे. अलीकडे कंगनानेही तेच केले. कधीही कुठल्या पार्टीत न दिसणारी कंगना अलीकडे एका पार्टीत दिसली आणि सगळ्यांचे लक्ष तिने वेधले. निमित्त होते ‘झी’ला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे. या निमित्त झी समूहाने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत कंगना सामील झाली. यावेळी ती पांढºया रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. साहजिकच तिचा लूक सगळ्यांपेक्षा वेगळा होता.या पार्टीत शाहरूख खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग असे सगळे सेलिब्रिटीही दिसले. पण या सगळ्यांत सर्वांचे लक्ष वेधले ते मात्र कंगनानेच. कंगना या पार्टीत का आली, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. व्यावसायिक कारणाने ती इथे होती, हे कुणापासूनही लपून राहिलेली नाही. आता व्यावसायिक कारणाने का होईना कंगना अलीकडे बरीच लवचिक झालीय, हे मात्र खरे. अलीकडे अशाच व्यावसायिक कारणाने कंगना करण जोहरच्या एका रिअ‍ॅलिटी शोवरही पोहोचली होती. खरे तर कंगना व करणचे गेल्या वर्षभरापासून बिनसले आहे. पण कंगनाने याऊपरही करण होस्ट करत असलेल्या या शोमध्ये जाण्यास होकार दिला. मला या शोमध्ये जाण्याचे पैसे मिळतात. त्यामुळे तो माझ्या कामाचा भाग आहे, असे कंगना याबद्दल म्हणाली होती.

ALSO READ : OMG! ​कंगना राणौतने पुन्हा डिवचले; म्हणे, ‘करण जोहर मेहमानों को जहर पिलाता है, मुझसे पुछो ’!!

एकंदर काय तर कंगना बदलतेय. व्यावसायिक कारणाने का होईना सगळ्या अंगाने परिपक्व होण्याचे तिचे प्रयत्न दिसताहेत. तिच्या या प्रयत्नांना आपण दाद द्यायलाच हवी.
Web Title: Kangna Ranaut reached the Bollywood party for the first time! Because you know too !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.