कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ पुन्हा नव्या वादात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:16 AM2018-12-19T10:16:13+5:302018-12-19T10:16:59+5:30

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आणि चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे.

 Kangana Ranaut's 'Manikarnika - The Queen of Jhansi' again in a new controversy! | कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ पुन्हा नव्या वादात!

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ पुन्हा नव्या वादात!

ठळक मुद्देहोय, अभिनेता एंडी वॉन इच याने चित्रपटाच्या निर्मात्यावर मानधनाची पूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप केला आहे.

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आणि चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट वादात सापडला आहे. होय, अभिनेता एंडी वॉन इच याने चित्रपटाच्या निर्मात्यावर मानधनाची पूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप केला आहे.
झी स्टुडिओने कमल जैन व निशांत जैन यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वॉन इचने या चित्रपटात इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. काल मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुसरीकडे वॉनने सोशल मीडियावर निर्मात्यांबद्दलची नाराजी बोलून दाखवली.


‘आज मणिकर्णिकाचा ट्रेलर रिलीज झाला. मला अद्यापही प्रॉडक्शन हाऊसने आपल्या कामाचा पूर्ण मोबदला दिलेला नाही,’ असे ट्विट वॉचने केले. अर्थात नंतर त्याने हे ट्विट डिलिटही केले.


क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली.
कंगनाने या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिने केवळ अभिनयचं केलेला नाही तर या चित्रपटाच्या अनेक सीन्सचे दिग्दर्शनही केले आहे.
राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. विशेष म्हणजे, नेमक्या याच दिवशी हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ रिलीज होणार असल्याने बॉक्सआॅफिसवर हृतिक विरुद्ध कंगना असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.

Web Title:  Kangana Ranaut's 'Manikarnika - The Queen of Jhansi' again in a new controversy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.