ठळक मुद्दे माझ्या चित्रपटाचा ट्रेलर वा टीजर पाहून एकही बोलत नाही. यावरून माझे काही अस्तित्वचं नाही, असे मी मानायचे का? असा सवाल कंगनाने केला.

कंगना राणौतने अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक स्थान निर्माण केले. ‘क्वीन’ या चित्रपटाने कंगनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या चित्रपटानंतर ख-या अर्थाने बॉलिवूड इंडस्ट्री कंगनाची दखल घेऊ लागली. आज कंगनाचे असंख्य चाहते आहेत. अनेक मोठ-मोठे प्रोजेक्ट तिच्याकडे आहेत. पण याऊपरही कंगना इंडस्ट्रीत स्वत:ला असुरक्षित समजते. इंडस्ट्रीने अद्यापही आपला स्वीकार केला नाही, असे तिला जाणवते. अलीकडे एका मुलाखतीत कंगनाने हे बोलून दाखवले.


मी माझ्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रींची प्रशंसा करताना जराही कचरत नाही. मग आलिया भट्ट असो की, अनुष्का शर्मा. मी मनापासून त्यांची प्रशंसा करते. अभिनेता असो वा अभिनेत्री त्याचे कौतुक करताना मी घाबरत नाही. सोनाक्षी सिन्हाचा ‘लुटेरा’ पाहिल्यावर मी वर्षभर तिचे कौतुक केले. असे असताना माझी प्रशंसा करताना मात्र लोक कचरतात. अशावेळी असे का? असा प्रश्न मला पडतो. इंडस्ट्री माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असेचं मला वाटते. माझे चित्रपट चालतात, ‘मणिकर्णिका’ला कोट्यवधी व्ह्युज मिळतात, याऊपरही कुणाच्या तोंडून कौतुकाचा एक शब्द बाहेर पडत नाही. माझ्या चित्रपटाचा ट्रेलर वा टीजर पाहून एकही बोलत नाही. यावरून माझे काही अस्तित्वचं नाही, असे मी मानायचे का? असा सवाल कंगनाने केला.


सध्या कंगना ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा भारही कंगनाने आपल्या खांद्यावर पेलला आहे.
कंगनाशिवाय अतुल कुलकर्णी, कुलभूषण खरबंदा, अंकिता लोखंडे, डॅनी डेन्जोंगपा, सुरेश ओबेरॉय अशी तगडी स्टारकास्ट यात आहे.


Web Title: Is Kangana Ranaut upset with being 'ignored'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.