Kangana Ranaut says, people would call me 'psycho', their 'misunderstanding' will overcome this 'film'! | ​कंगना राणौत म्हणते, लोक मला ‘सायको’ म्हणायचे, ‘या’ चित्रपटाने दूर होईल त्यांचा गैरसमज!
​कंगना राणौत म्हणते, लोक मला ‘सायको’ म्हणायचे, ‘या’ चित्रपटाने दूर होईल त्यांचा गैरसमज!
कंगना राणौत हिची गणना आजघडीला बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. याचे कारण म्हणजे, तिने साकारलेल्या वैविध्यपूर्ण आणि दमदार भूमिका. ज्याने कुणी कंगनाचा अभिनय पाहिला, तो तिच्या प्रेमात पडला. पण आज यशाच्या शिखरावर विराजमान असणा-या याच कंगनाला कधीकाळी ‘वेडी’ म्हणून हिणवले जायचे. ‘सायको’ सारख्या नावांनी लोक तिला बोलवायचे. आज याच हिणवणा-यांची तोंडे कंगनाने बंद केलीत.  
लवकरच कंगनाचा ‘मेंटल’ हा सिनेमा येतोय. यात  कंगना व राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. प्रकाश कोवेलामुडी दिग्दर्शित हा चित्रपट एक सायकॉलॉजिक थ्रीलर आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने एकेकाळी तिला ‘सायको’ म्हणून हिणवणा-यांचा खरपूस समाचार घेतला. भूतकाळात माझ्या आयुष्याने अनेक चढऊतार पाहिले. पण त्याआधारावर मला वेगवेगळी नावे देऊन लोकं मोकळी झालीत. लोकांनी मला ‘सायको’ म्हटले. वेडे ठरवले. मला नाही नाही ते बोलले. पण माझा ‘मेंटल’ हा सिनेमा मला वेडे ठरवणा-यांना सणसणीत उत्तर असेल. माझ्या  या सिनेमाने लोकांचे माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतील. स्क्रिप्ट वाचताक्षणी हा चित्रपट लोकांच्या संकुचित मानसिकतेला उत्तर ठरेल, हे माझ्या लक्षात आले होते. चित्रपटाची स्क्रीप्ट अतिशय संवेदनशील आहे. एकटेपणा आणि  त्याच एकटेपणाचे महत्त्व यात अतिशय वेगळ्या आणि प्रभावीपणे दाखवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत, असे कंगना म्हणाली.

ALSO READ : ​ कंगना राणौतने अचानक घेतला मोठा निर्णय! हृतिक रोशनलाही बसेल धक्का!!

कंगनाने याआधीही राजकुमार रावसोबत काम केले आहे. ‘क्वीन’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. आता ही जोडी पुन्हा एकदा ‘मेंटल’द्वारे पे्रक्षकांचे मनोरंजन करणार आहे. केवळ मनोरंजनचं नाही कंगना म्हणते त्याप्रमाणे लोकांचे ‘क्वीन’बद्दलचे गैरसमजही हा चित्रपट दूर करणार आहे. आता ते कसे, ते लवकरच बघू,
Web Title: Kangana Ranaut says, people would call me 'psycho', their 'misunderstanding' will overcome this 'film'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.