कंगना रणौत सांगतेय, स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानीने अंर्तवस्त्राशिवाय करायला सांगितले होते फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:05 PM2019-03-28T17:05:40+5:302019-03-28T17:11:42+5:30

कंगनाने क्वीन, तनू वेड्स मनू, मणिकर्णिका यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण कंगनाला यश सहजासहजी मिळालेले नाहीये. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावा लागला.

Kangana Ranaut reveals she was asked to pose in robe and 'no undergarments' for a Pahlaj Nihalani film | कंगना रणौत सांगतेय, स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानीने अंर्तवस्त्राशिवाय करायला सांगितले होते फोटोशूट

कंगना रणौत सांगतेय, स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानीने अंर्तवस्त्राशिवाय करायला सांगितले होते फोटोशूट

googlenewsNext
ठळक मुद्देपहलाज निहलानी यांनी मला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. या चित्रपटाचे नाव आय लव्ह यू बॉस असे होते. या चित्रपटासाठी एक फोटोशूट होणार होते. मला त्यांनी रोब म्हणजेच ट्रान्सपरंट गाऊन घालायला दिला होता. पण त्यासोबत अंर्तवस्त्र नव्हती.

कंगना राणौतच्या कुटुंबातील कोणाचाच ग्लॅमर दुनियेशी कोणताच संबंध नव्हता. कंगनाचे वडील अमरदीप व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई आशा शिक्षिका आहे. कंगनाचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून कंगनाने आपले शिक्षण पूर्ण केले. कंगना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने क्वीन, तनू वेड्स मनू, मणिकर्णिका यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पण कंगनाला यश सहजासहजी मिळालेले नाहीये. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावा लागला.

कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी वादात अडकलेली असते. कंगना नुकतेच निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांच्या एका चित्रपटाविषयी मिडे-डेशी बोलली आहे. तिने सांगितले आहे की, मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मला अनेक वाईट अनुभवांना तोंड द्यावे लागले होते. त्या वेळात मला अनेक लोक भेटायचे, जे मला सांगायचे की मी तुला या क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन देईन, मदत करेन.

पहलाज निहलानी यांनी मला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. या चित्रपटाचे नाव आय लव्ह यू बॉस असे होते. या चित्रपटासाठी एक फोटोशूट होणार होते. मला त्यांनी रोब म्हणजेच ट्रान्सपरंट गाऊन घालायला दिला होता. पण त्यासोबत अंर्तवस्त्र नव्हती. मी या चित्रपटात एका मुलीची भूमिका साकारणार होती, जिच्या मनात तिच्या बॉसविषयी लैंगिक भावना आहेत. ती एक सॉफ्ट पोर्न भूमिका होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी हे सगळे ऐकूनच मी हे काम करू शकत नाही असे सांगितले आणि तिथून अक्षरशः पळत काढला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यानंतर मी काही दिवस सगळ्यांपासून लपून राहात होते. मी माझा नंबर देखील बदलला होता.

त्यानंतर काही काळाने मला गँगस्टर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या करियरला एक दिशा मिळाली. मी गँगस्टर आणि पोकिरी या दोन्ही चित्रपटांसाठी एकाच काळात ऑडिशन दिले होते आणि दोन्ही चित्रपटांसाठी माझी निवड झाली होती. पण मी गँगस्टरमध्ये काम करण्याचे ठरवले.

Web Title: Kangana Ranaut reveals she was asked to pose in robe and 'no undergarments' for a Pahlaj Nihalani film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.