'मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए' कंगनाच्या मणिकर्णिकामधले दुसरे अंगावर शहारा आणणारं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 07:04 PM2019-01-16T19:04:38+5:302019-01-16T19:14:26+5:30

कंगना राणौतचा देशभक्तीवर आधारित सिनेमा मणिकर्णिका सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सिनेमातील दुसरं गाणं नुकतेच लाँच झाले आहे.

kangana ranaut film manikarnika song bharat launch | 'मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए' कंगनाच्या मणिकर्णिकामधले दुसरे अंगावर शहारा आणणारं गाणं

'मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए' कंगनाच्या मणिकर्णिकामधले दुसरे अंगावर शहारा आणणारं गाणं

googlenewsNext
ठळक मुद्दे या गाण्याला कमी कलावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगना राणौतचा देशभक्तीवर आधारित सिनेमा मणिकर्णिका सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सिनेमातील दुसरं गाणं नुकतेच लाँच झाले आहे. 'देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला कमी कलावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  

या गाण्याला संगीत शंकर एहसान लॉयने दिले आहे. तर गाण्याचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत. गाण्याचे शूट ऐतिहासिक लोकेशन्सवर करण्यात आले आहे. या गाण्यात राणी लक्ष्मीबाईं यांचे बालपणापासून लढाईपर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. याआधी विजयी भव हे मणिकर्णिकामधील गाणं प्रदर्शित करण्यात आले होत.

कंगनाचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा सिनेमा राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे कंगना प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ला बॉक्सआॅफिसवर किती यश मिळते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.'मणिकर्णिका'  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: kangana ranaut film manikarnika song bharat launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.