Kangana Ranaut and Rajkumar reach London! | कंगना राणौत आणि राजकुमार पोहोचले लंडनला !

सध्या बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आपला आगामी चित्रपट 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती या चित्रपटात एक इसओवर आर्टिस्टची भूमिका साकाराते आहे. यात तिच्यासोबत राजकुमार राव एक दिसणार आहे. कंगना या चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी लंडनला पोहोचली आहे. मुंबईत त्यांनी चित्रपटाचे पहिले शूटिंगचे शेड्यूल पूर्ण केले आहे.  नुकतेच तिच्या टीमकडून कंगानाचा लंडनमधला फोटो शेअर केला आहे. ज्यात ती दिग्दर्शक प्रकाश कोवलामुडींसोबत स्क्रिप्टचे रीडिंग सेशन करताना दिसणार आहे. राजकुमार राव क्वीननंतर 'मेंटल है क्या'मध्ये दुसऱ्यांदा कंगनासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. एका इंटरव्हु दरम्यान तो म्हणाला होता की, कंगनासोबत काम करण्यासाठी तो खूष आहे. कारण कंगना सध्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.
 
रिपोर्ट्सनुसार, कंगना 'मेंटल है क्या' चित्रपटानंतर लवकरच दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारीच्या आगामी चित्रपट दिसणार आहे. मेंटलची शूटिंग जुलैमध्ये संपणार आहे. याचबरोबर 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता मात्रा स्पेशल इफेक्ट्सचे काम अजून बाकी आहे. आता निर्माते  सप्टेंबरमध्ये चित्रपट रिलीज करण्याचा विचार करतायेत.  

ALSO READ :   भाचा पृथ्वीराजसोबत कंगना राणौतची बाँडिंग; शेअर केला क्युट फोटो!

'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या  निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत. बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.Web Title: Kangana Ranaut and Rajkumar reach London!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.