OMG! कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:32 AM2019-02-20T11:32:28+5:302019-02-20T11:33:39+5:30

होय, चित्रपटाच्या बजेटवरून दिग्दर्शक शंकर व निर्मात्यांत वाद झाल्यामुळे ‘इंडियन 2’च्या शूटींगमध्ये अडचणी येत असल्याचे कळतेय.

kamal hassan starrer indian 2 might get shelved | OMG! कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर!!

OMG! कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर!!

googlenewsNext
ठळक मुद्देइंडियन 2’नंंतर कमल हासन अभिनयातून संन्यास घेणार आहेत. स्वत: कमल हासन यांनी एका पत्रपरिषदेत ही माहिती होती.

रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत ‘2.0’ सारखा सुपरडुपर हिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक शंकर  ‘इंडियन 2’ या नव्या चित्रपटात बिझी झालेत. हा चित्रपट २३ वर्षांपूर्वी आलेल्या कमल हासन यांच्या ‘इंडियन’चा सीक्वल आहे. या सीक्वलमध्येही कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. पण ताजी बातमी खरी मानाल तर तूर्तास ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर आहे. होय, चित्रपटाच्या बजेटवरून दिग्दर्शक शंकर व निर्मात्यांत वाद झाल्यामुळे ‘इंडियन 2’च्या शूटींगमध्ये अडचणी येत असल्याचे कळतेय.




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर आणि लाईका प्रॉडक्शन यांच्यात ‘इंडियन 2’च्या बजेटवरून मतभेद वाढले आहेत. हे मतभेद इतके टोकाला पोहोचलेत की, निर्माते या चित्रपटातून अंग काढून घेण्याच्या विचारात आहेत. असे झाले तर ‘इंडियन 2’ पूर्ण होणे अशक्य आहे. शंकर यांचा ‘2.0’ हा चित्रपटही लाईका प्रॉडक्शनने प्रोड्यूस केला होता. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. पण याऊपरही ‘इंडियन 2’वर मोठा डाव लावण्यास लाईका प्रॉडक्शन तयार नाही. तूर्तास या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पण लाईका व शंकर यांच्यापैकी कुणीही या वृत्ताचे अद्याप खंडन केलेले नाही.




दिग्दर्शक शंकर यांना मेगा बजेट चित्रपटांसाठीचं ओळखले जाते. तेव्हा ‘इंडियन 2’साठी ते नक्कीच निर्मात्यांची मनधरणी करतील, अशी आशा बाळगू या. ‘इंडियन 2’नंंतर कमल हासन अभिनयातून संन्यास घेणार आहेत. स्वत: कमल हासन यांनी एका पत्रपरिषदेत ही माहिती होती. ‘इंडियन 2’ हा माझा अखेरचा चित्रपट असेल. यानंतर मी अभिनय कायमचा सोडणार आहे, असे त्यांनी सांगितले होते.   आपल्या ६४ व्या वाढदिवशी कमल हासन यांनी ‘इंडियन 2’ची घोषणा केली होती. या चित्रपटात त्यांच्या अपोझिट काजल अग्रवाल दिसणार आहे.  

Web Title: kamal hassan starrer indian 2 might get shelved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.