‘या’ चित्रपटानंतर कमल हासन घेणार ‘चित्रपट संन्यास’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 03:20 PM2018-12-04T15:20:38+5:302018-12-04T15:23:13+5:30

कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, कमल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

kamal hassan announced that he is quitting acting after film indian 2 sequel of indian | ‘या’ चित्रपटानंतर कमल हासन घेणार ‘चित्रपट संन्यास’!!

‘या’ चित्रपटानंतर कमल हासन घेणार ‘चित्रपट संन्यास’!!

googlenewsNext
ठळक मुद्दे वयाच्या तिस-या वर्षी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणारे व सुमारे २०० वर चित्रपटांत काम करणारे कमल हासल आता दक्षिण भारतातील राजकारणात आपले पाय पसरवू पाहत आहेत.

कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, कमल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अभिनय कायमचा सोडण्याचा. होय, डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘इंडियन 2’नंतर कमल हासन अभिनयातून संन्यास घेणार आहेत. स्वत: कमल हासन यांनी एका पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ‘इंडियन 2’ हा माझा अखेरचा चित्रपट असेल. यानंतर मी अभिनय कायमचा सोडणार आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या १४ डिसेंबरपासून ‘इंडियन 2’चे शूटींग सुरू होत आहे. हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या त्यांच्या ‘इंडियन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आहे. आपल्या ६४ व्या वाढदिवशी कमल हासन यांनी ‘इंडियन 2’ची घोषणा केली होती. या चित्रपटात त्यांच्या अपोझिट काजल अग्रवाल दिसणार आहे. ‘2.0’चे दिग्दर्शक शंकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.


 वयाच्या तिस-या वर्षी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणारे व सुमारे २०० वर चित्रपटांत काम करणारे कमल हासल आता दक्षिण भारतातील राजकारणात आपले पाय पसरवू पाहत आहेत.अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली आहे. ‘मक्कल नीथी मय्यम’ असे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीही कमल हासन यांनी अभिनय कायमचा सोडण्याचे संकेत दिले होते. लोकांना मी राजकीय नेता म्हणून नाही तर अभिनेता म्हणून अधिक आवडतो, मला माहित आहे. याचे कारण म्हणजे, त्यांनी सुरुवातीपासून अभिनेता म्हणूनचं माझ्यावर प्रेम केले आहे. आता माझ्यातील नेत्याची ओळख मी त्यांना करून देणार आहे. माझ्यातील या नेत्यावरही लोक तितकेच प्रेम करतील, हा माझा विश्वास आहे, असे  ते म्हणाले होते.

Web Title: kamal hassan announced that he is quitting acting after film indian 2 sequel of indian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.