कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या चित्रीकरणाला होणार ह्या दिवशी सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:21 PM2019-01-03T13:21:23+5:302019-01-03T13:30:07+5:30

'इंडियन २' चित्रपटाच्या शूटिंगला १८ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे.

Kamal Haasan's 'Indian 2' to finally start rolling from January 18 | कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या चित्रीकरणाला होणार ह्या दिवशी सुरूवात

कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या चित्रीकरणाला होणार ह्या दिवशी सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्दे'इंडियन २' चित्रपट 'इंडियन' चित्रपटाचा सीक्वल कमल हासनसोबत दिसणार काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते कमल हासन त्यांच्या आगामी सिनेमा 'इंडियन २'मुळे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

कमल हासन यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीला त्यांच्या चाहत्यांना छान सरप्राइज दिले आहे. ते म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'इंडियन २' चित्रपटाच्या शूटिंगला १८ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'इंडियन २' चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झालेला इंडियन चित्रपटाचा सीक्वल आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट '२.०'चे दिग्दर्शक एस. शंकर करत आहेत. इंडियन २च्या चित्रीकरणाला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरूवात होणार होती. मात्र काही कारणास्तव चित्रीकरणाला सुरूवात झाली नाही. 
काही दिवसांपूर्वी कमल हासन यांनी सांगितले की, 'इंडियन २' चित्रपटानंतर ते सिनेइंडस्ट्रीला राम राम करणार आहेत. ते म्हणाले होते की, या वेळी लोकसभा निवडणूकीत ते उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. त्यामुळे 'इंडियन २' चित्रपटानंतर ते अभिनय करणार नाहीत. ते सिनेमाची निर्मिती करून सिनेइंडस्ट्रीशी जोडलेले राहणार आहेत. कमल हासन यांचा राजकीय पक्ष मक्कल नीधि मय्यम सध्या खूप चर्चेत आहे. कारण हा पक्ष सध्या तामीळनाडूमध्ये खूप सक्रीय आहे. 

Web Title: Kamal Haasan's 'Indian 2' to finally start rolling from January 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.