Kalki Kochlin in 'Naked' | ‘नेकेड’मध्ये कल्की कोच्लिन

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोच्लिन ही नेकेड या लघुपटात काम करीत आहे. यामध्ये ती एका सँडी नावाच्या अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. 
सँडीच्या एका चित्रपटातील सेक्सी सीन लीक होतो आणि सर्वत्र व्हायरल होतो. पत्रकार रिया ही तिची या दृष्यासंदर्भात मुलाखत घेते. ‘पुरूषांनी तुला नग्न रुपात पाहिले आहे, आता ते तुला पुढील चित्रपटात स्वीकारतील का? अशा आशयाचे प्रश्न ती विचारते. त्यावर सँडी म्हणते, तु सुद्धा? आंतरराष्टÑीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘नेकेड’ हा लघुपट प्रदर्शित होतो आहे. हा लघुपट अनेक प्रश्नांची उकल साधण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत पत्रकार आणि माध्यमे कशा पद्धतीने वार्तांकन करतात, ही खासगी बाब लोक कशा पद्धतीने व्यक्त करतात, याविषयी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नेकेड हा चित्रपट राकेश कुमार दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटात कल्की कोच्लिनसोबत रिताभरी चक्रवर्ती देखील आहे. 
आपल्या भूमिकेबाबत रिताभरीने सांगितले, एके दिवशी मला माझ्या बॉसचा दूरध्वनी येतो. एका अभिनेत्रीची भूमिका असणाºया चित्रपटातील  क्लिप (ज्यात सेक्स्युअल दृष्ये आहेत) व्हायरल होते, अशा अभिनेत्रीची मुलाखत घ्यायची आहे. त्यानंतर जे काही घडते, ते या चित्रपटात आहे.’
कल्की कोच्लिनने यापूर्वी ट्विट करताना सांगितले, ‘आम्हा मुलींसाठी ही चांगली गोष्ट नाही. महिला दिवसाच्या निमित्ताने हा लघुपट येतो आहे.

 
Web Title: Kalki Kochlin in 'Naked'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.