वरूण धवनच्या कानाखाली दिसला ‘24’चा टॅटू; काय आहे रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 10:30 AM2019-03-13T10:30:14+5:302019-03-13T10:33:49+5:30

अभिनेता वरूण धवनचा आगामी चित्रपट ‘कलंक’चा टीजर काल रिलीज झाला. ‘कलंक’च्या संपूर्ण स्टारकास्टने या टीजर लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे सगळे यावेळी दिसले. पण त्यांच्यापैकी सर्वांचे लक्ष वेधले ते वरूणने.

kalank teaser launch varun dhawan tattoo 24 just hint at his wedding date or birthday | वरूण धवनच्या कानाखाली दिसला ‘24’चा टॅटू; काय आहे रहस्य?

वरूण धवनच्या कानाखाली दिसला ‘24’चा टॅटू; काय आहे रहस्य?

googlenewsNext
ठळक मुद्देवरूणचा ‘कलंक’ हा चित्रपट येत्या 17 एप्रिलला रिलीज होतोय. अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा चित्रपट करण जोहर, साजिद नाडियाडवाला, हिरू यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी प्रोड्यूस केला आहे.

अभिनेता वरूण धवनचा आगामी चित्रपट ‘कलंक’चा टीजर काल रिलीज झाला. ‘कलंक’च्या संपूर्ण स्टारकास्टने या टीजर लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे सगळे यावेळी दिसले. पण त्यांच्यापैकी सर्वांचे लक्ष वेधले ते वरूणने. कारण काय, तर वरूणचा टॅटू. होय, वरूणच्या कानाखाली ‘24’ असा एक टॅटू गोंदलेला दिसला. मग काय, वरूणचा हा टॅटू चर्चेचा विषय ठरला. ‘24’ नंबरच्या या टॅटूमधून वरूण काय सुचवू शकतो,यावर अनेक तर्क लढवले गेलेत.

काहींच्या मते, ‘24’ ही वरूणच्या लग्नाची तारीख असू शकते किंवा वरूणचा आगामी चित्रपट ‘स्ट्रिट डान्सर’च्या रिलीज डेटचे संकेतही यामागे असू शकतात. वरूणची बर्थ डेट अर्थात जन्मतारीखही 24 एप्रिल आहे. त्यामुळे कदाचित वरूणने आपल्या बर्थ डेटचा टॅटू बनवला असू शकतो,असे अनेक तर्क यातून काढले गेले. पण शेवटी हे सगळे तर्कच.  टॅटूमागचे खरे कारण तर  वरूणलाच ठाऊक.


वरूणच्या लग्नाबद्दल सांगायचे तर गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत वरूण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. याचवर्षी डिसेंबरमध्ये हे लग्न होणार असल्याची चर्चा आहे. अर्थात वरूणने अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.
वरूणचा ‘कलंक’ हा चित्रपट येत्या 17 एप्रिलला रिलीज होतोय. अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा चित्रपट करण जोहर, साजिद नाडियाडवाला, हिरू यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी प्रोड्यूस केला आहे.

Web Title: kalank teaser launch varun dhawan tattoo 24 just hint at his wedding date or birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.