Kalank Poster Out: Sanjay Dutt and Madhuri Dixit appear on screen again after 21 years! Varun Dhawan-Alia Bhatt will also be seen with !! | Kalank Poster Out​ : २१ वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर दिसणार संजय दत्त- माधुरी दीक्षितची जोडी! वरूण धवन-आलिया भट्टही दिसणार सोबत!!

अभिनेता संजय दत्त व अभिनेत्री माधुरी दीक्षित ही जोडी पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार की नाही, यावरून गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा सुरु आहे. अभिषेक बर्मन दिग्दर्शित ‘शिद्दत’ या आगामी चित्रपटात श्रीदेवी झळकणार होत्या. पण त्यांच्या अकाली निधनानंतर या चित्रपटात श्रीदेवींच्या जागी माधुरी दीक्षितची वर्णी लागली. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित व संजय दत्तची जोडी दिसेल अशी चर्चा होती. या चर्चेने चाहतेही सुखावले होते. कारण, या चित्रपटामुळे तब्बल २१ वर्षांनंतर संजय व माधुरी जोडी एकत्र दिसणार होती. पण नंतर माधुरीच्या एन्ट्रीमुळे संजयने हा चित्रपट सोडला, अशी बातमी आली आणि संजय-माधुरीच्या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याचे प्रेक्षकांचे स्वप्न जणू भंगले. पण आता याच पे्रक्षकांसाठी आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. होय, माधुरीच्या एन्ट्रीमुळे संजयने हा चित्रपट सोडला, ही बातमी खोटी ठरली आहे. माधुरी व संजय ही जोडी कायम आहे. फक्त बदलले आहे ते चित्रपटाचे नाव. होय,अभिषेक बर्मन दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव  ‘शिद्दत’ नाही तर ‘कलंक’ असे आहे.



या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालीय.  करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने काही तासांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. करण जोहर , साजिद नाडियाडवाला आणि अपूर्व मेहता निर्मित हा चित्रपट अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहे. या मेगास्टारर चिपटात माधुरी व संजयशिवाय सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि आदित्य राय कपूर यांची वर्णी लागली आहे. पुढील वर्षी १९ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होईल.

ALSO READ : शूटिंगच्या पहिल्याच दिवशी असे काही घडले की, माधुरी दीक्षित संजय दत्तची ‘सजनी’ बनली!

१९९३ मध्ये सुभाष घर्इंच्या ‘खलनायक’ मध्ये संजय व माधुरीची जोडी अखेरची एकत्र दिसली होती. पण यानंतर या दोघांनीही  एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. आता यामागची पार्श्वभूमी सगळ्यांनाच ठाऊक आहे. याकाळात संजय व माधुरीच्या अफेअरच्या चर्चा उठल्या होत्या. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन संजय माधुरीसोबत लग्न करणार, इथपर्यंत चर्चा होती. पण ‘खलनायक’ रिलीज होण्यापूर्वीच संजय दत्त टाडा केसमध्ये तुरूंगात गेला आणि माधुरीने संजयपासून अंतर राखणे सुरु केले. संजय तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावरही माधुरी त्याला भेटली नाही. दोघांमधील अंतर इतके वाढले की,त्यांनी एकमेकांसोबत चित्रपट करणेही बंद केले.पण आता तो भूतकाळ झाला....
Web Title: Kalank Poster Out: Sanjay Dutt and Madhuri Dixit appear on screen again after 21 years! Varun Dhawan-Alia Bhatt will also be seen with !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.