DDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार! ऐकून शाहरूखलाही येईल हसू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 10:03 PM2018-08-21T22:03:56+5:302018-08-21T22:04:45+5:30

‘रोमान्सचा बादशहा’ शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल यांचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएेंगे’ हा आयकॉनिक सिनेमा कोण बरे विसरू शकेल. बॉलिवूडमधला मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचा शेवटही तितकाच यादगार आहे

 Kajol's sweet complaint about DDLJ's climax scene | DDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार! ऐकून शाहरूखलाही येईल हसू!!

DDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार! ऐकून शाहरूखलाही येईल हसू!!

googlenewsNext

‘रोमान्सचा बादशहा’ शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल यांचा ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएेंगे’ हा आयकॉनिक सिनेमा कोण बरे विसरू शकेल. बॉलिवूडमधला मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचा शेवटही तितकाच यादगार आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या दृश्यात अमरीश पुरी ‘जा सिमरन जा... जी ले अपनी जिंदगी’ म्हणत सिमरनला आपल्या प्रियकरासोबत जाण्याची परवानगी देतात आणि सिमरन धावत्या ट्रेनसोबत राज अर्थात शाहरूखच्या दिशेने धावत सुटते. राज तिला हात देतो आणि सिमरन व राज एकत्र येतात. हा सीनही प्रचंड गाजला. हा सीन आठवण्याचे कारण म्हणजे अलीकडे सिमरनची भूमिका साकारणाऱ्या काजोलने दिलवाले ‘दुल्हनियां ले जाएेंगे’बद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला. विशेषत: या क्लायमॅक्स सीनचे शूटींग कसे झाले होते, ते तिने सांगितले.


‘खरे सांगायचे तर आम्ही गर्मीने वैतागलो होतो. माझे केस विस्कटत होते. ट्रेन ज्या स्पीडने धावायला हवी होती, ती त्या स्पीडने नव्हतीचं आणि रिटेक घ्यायला काहीही चान्स नव्हता. कारण ट्रेन परत यायला पुन्हा २० मिनिटं गेली असती,’असे तिने सांगितले. केवळ इतकेच नाही तर ‘ट्रेनच्या मागे मला वेड्यासारखे धावायला लावण्याऐवजी राजने ट्रेनची साखळी ओढायला हवी होती’ असेही ती म्हणाली.  
या क्लायमॅक्समध्ये आदित्य चोप्राला बॅकग्राऊण्ड म्युझिक वापराचे नव्हते. मात्र सलमानच्या ‘मैंने प्यार किया’मधील क्लायमॅक्समध्ये ‘आय लव्ह यू’ गाण्याचा वापर केलेला पाहून आदित्यनेही डीडीएलजेच्या क्लायमॅक्समध्ये ‘‘तुझे देखा तो ये’चे आॅर्केस्ट्रा व्हर्जन वापरण्याचे ठरवले. हा सीन पुढे ‘मैने प्यार किया’पेक्षाही गाजला.

काजोलचा ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होतोय. सध्या काजोल याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

 

 

Web Title:  Kajol's sweet complaint about DDLJ's climax scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kajolकाजोल