Kajol's son Gibran, given the reason for not refusing to give a match, face for acting | काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा जिब्रानला करण जोहरने दिला नकार,अभिनयासाठी मॅच्युअर चेहरा नसल्याचे दिले कारण

'कभी खुशी कभी गम' या सिनेमात शाहरुख आणि काजोल यांच्या मुलाची भूमिका जिब्रान यानं साकारली होती. आता हा चिमुकला जिब्रान मोठा झाला आहे.त्यामुळे आता जिब्रान पुन्हा एकदा अभिनेता म्हणून रसिकांच्या भेटीला येईल अशा चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु होत्या.मात्र त्याला अभिनेता म्हणून लॉन्च करण्यास बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहर यांनी नकार दिला आहे.करण जोहरच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' सिनेमात जिब्रान वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र ही भूमिका रुपेरी पडद्यावर नसून पडद्यामागची असणार आहे.जिब्रान या सिनेमात चीफ असिस्टंट दिग्दर्शकाची जबाबदारी पार पडणार आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी जिब्रानने करणकडे विचारणा केल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या.मात्र तुझा चेहरा अभिनयासाठी मॅच्युअर झाला नसल्याचे कारण देत करणनं त्याला भूमिका नाकारली आहे.त्यासाठी काही काळ पडद्यामागे काम करण्याचा सल्लाही केजोने त्याला दिला.आता करणचा सल्ला जिब्रान किती मनावर घेतो आणि त्याला चीफ असिस्टंट दिग्दर्शकाची भूमिका करियर घडवण्यासाठी कितपत फायदेशीर ठरेल हे आगामी काळात स्पष्ट होईल.


बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण जोहरने ब्रह्मस्त्र चित्रपटाची घोषणा ट्विटर अकाऊंटवर केली होती. कारण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे ही जाहीर केले की 'ब्रह्मस्त्र' चा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाईल.या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे होते मात्र आता नावात बदल करत ब्रम्हस्त्र असे करण्यात आले आहे.अयान मुखर्जी भरपूर दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होते .ज्यामध्ये एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्भुत शक्ति आहे. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मस्त्र' असे ठेवले आहे. हा चित्रपट ३ भागात बनणार आहे. ज्याचा पहिला भाग २०१९ मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
Web Title: Kajol's son Gibran, given the reason for not refusing to give a match, face for acting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.