Kajol's film 'Comeback'; Role play an important role! | काजोल ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक; साकारणार महत्त्वाची भूमिका!

बºयाच काळापासून पडद्यावरून गायब असलेली अभिनेता अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा कमबॅक करण्यास तयार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ईला’ असे असून, त्यामध्ये ती एक मुलाच्या आईची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वृत्तानुसार, ‘ईला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करणार आहेत. चित्रपटात राष्टÑीय पुरस्कार विजेता रिद्धी सेन हादेखील बघावयास मिळणार आहे. तो काजोलच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. 

असे सांगितले जात आहे की, काजोल या चित्रपटात आई व्यतिरिक्त पेशाने गायिका असणार आहे. दरम्यान, काजोल गेल्या काहीकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. ती अखेरीस साउथ सुपरस्टार धनुषच्या ‘व्हीआयपी-२’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. या व्यतिरिक्त काजोल अखेरीस ‘दिलवाले’ या हिंदी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूडचा किंग शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता. तिचा हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. 

दरम्यान, काजोल जरी पडद्यावरून गायब असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करते. जेव्हा तिच्या पतीचा म्हणजेच अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘रेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा ती या चित्रपटाच्या अनुषंगाने ट्विट करून चाहत्यांच्या संपर्कात होती. त्यावेळी तिने चित्रपट सुपरहिट होणार असल्याचे भाकितही वर्तविले होते. अर्थातच तिचे हे भाकित खरे ठरले. चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. 
Web Title: Kajol's film 'Comeback'; Role play an important role!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.