काजोल आणि अमिताभ बच्चन एकत्र झळकणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:36 PM2018-08-14T18:36:18+5:302018-08-14T18:37:02+5:30

बऱ्याच वर्षानंतर काजोल व अमिताभ बच्चन एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.

Kajol and Amitabh Bachchan will share screen together in this film | काजोल आणि अमिताभ बच्चन एकत्र झळकणार ह्या सिनेमात

काजोल आणि अमिताभ बच्चन एकत्र झळकणार ह्या सिनेमात

googlenewsNext
ठळक मुद्दे'हेलिकॉप्टर ईला'मध्ये अमिताभ बच्चन पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत

अभिनेत्री काजोलचा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'हेलिकॉप्टर ईला' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात काजोल विभक्त झालेल्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मुलासाठी अविरत झटणाऱ्या एका महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात काजोलसोबत अभिनेते अमिताभ बच्चनदेखील दिसणार असल्याचे समजते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करीत असून सहनिर्मिती अजय देवगण करतो आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन 'हेलिकॉप्टर ईला' चित्रपटात स्पेशल अपियरन्स करताना दिसणार आहेत. प्रदीप सरकार यांनी सांगितले की, या चित्रपटातील एका सीनसाठी अमिताभ बच्चन यांची गरज होती. त्यामुळे आम्ही त्यांना हा सीन करण्यासाठी विनंती केली. हा खूप महत्त्वाचा सीन असून अमिताभ बच्चन यांनी होकार दिला आहे. त्यामुळे ते या सिनेमात केमियो करताना दिसणार आहेत.

अमिताभ बच्चन व काजोल 'कभी खुशी कभी गम' या सिनेमात एकत्र दिसले होते. काजोल हिने अमिताभ बच्चन यांच्या सूनेची भूमिका यात साकारली होती. 'हेलीकॉप्टर ईला'च्या ट्रेलरमधूनच सिनेमाबाबतच्या अनेक गोष्टी उलगडल्या आहेत. एक आई आणि तिच्या मुलाची ही कथा आहे. अति प्रेम करण्याच्या नादात ती त्याच्यावर नकळत खूप दबाव टाकू लागते. पण पुढे नेमके काय घडते, हे सिनेमात पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांंना लागली आहे.
'हेलीकॉप्टर ईला' ही एक मॉर्डन आई आणि तिच्या एकुलत्या एक मुलाची हटके कहाणी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्य आयुष्याच्या फार जवळची वाटते. जबाबदार आईबरोबरच एका महत्वाकांक्षी गायिकेच्या रुपात काजोलला या सिनेमात पाहता येणार आहे. मितेश शाह द्वारा लिखित अजय देवगण आणि पेन इंडियाद्वारा निर्मित हेलीकॉप्टर ईला हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 


 

Web Title: Kajol and Amitabh Bachchan will share screen together in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.