Junkie Kapoor already 'song' song on 'singing' song, video viral! | ‘धडक’ अगोदरच जान्हवी कपूरने ‘या’ गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल!

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी पूर्णपणे तयार आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘धडक’चा फर्स्ट लूक आणि रिलीज डेट समोर आली होती. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये जान्हवीच्या या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे. मात्र त्यापूर्वीच जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ती एका गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. वास्तविक आतापर्यंत जान्हवीच्या अनेक अदा तिच्या चाहत्यांना बघावयास मिळाल्या. परंतु पहिल्यांदाच जान्हवी डान्स करताना दिसत असल्याने तिचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

जान्हवीचा हा व्हिडीओ तिची डान्स ट्रेनर चारवी भारद्वाज हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मिळाला आहे. व्हिडीओमध्ये चारवी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चारवी डान्स करीत असतानाच तिच्या मागे जान्हवी एंट्री करीत काही डान्स मुव्स करताना दिसते. या व्हिडीओमध्ये जान्हवी काही सेकंदच डान्स करीत असली तरी तिच्यातील लकब बघून ती बॉलिवूड एंट्रीसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे हेच सिद्ध होते. त्याचबरोबर जान्हवीच्या या अदा बघून तीदेखील तिच्या आईप्रमाणेच उत्कृष्ट डान्सर म्हणून स्वत:ला सिद्ध करेल हे दिसून येते. 
 

असो, जान्हवीच्या ‘धडक’ या डेब्यू चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन हाउसअंतर्गत केली जात आहे. चित्रपटात शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान करीत आहेत. ‘धडक’ हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार असून, जान्हवीच्या अदा प्रेक्षकांना भावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
Web Title: Junkie Kapoor already 'song' song on 'singing' song, video viral!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.