Jiharan Khan was going to commit suicide; The determination of the words changed to 'sing' | आत्महत्या करणार होती जरीन खान; ‘या’ गाण्याचे शब्द ऐकताच बदलला निर्धार!

जरीन खानने आयुष्य संपविण्याचा जवळपास निर्धार केला होता. कारण विषाची बाटली घेऊन ती एका तळ्याच्या काठावर बसली होती. विष पिणार तोच तिच्या कानावर असे काही बोल पडतात, ज्यामुळे ती आत्महत्या करण्याचा विचार बदलते. कारण हे शब्द तिला पुन्हा जगण्याची उमेद देण्यासाठी प्रेरित करतात. पुढे ती हसत हसत आयुष्याला स्वीकारते. आता तुम्ही म्हणाल की, हा किस्सा एखाद्या चित्रपटात असायला हवा. तर हा किस्सा तिच्या रिअल लाइफमधील नसून रिल लाइफमधीलच आहे. होय, जरीनच्या आगामी चित्रपटाचे एक गाणे रिलीज करण्यात आले असून, हा सर्व प्रसंग त्यामध्येच दाखविण्यात आला आहे. 

जरीनच्या आगामी ‘१९२१’ या हॉरर चित्रपटाचे पहिले गाणे आज रिलीज करण्यात आले. ‘सुन ले जरा’ असे गाण्याचे बोल असून, त्यास अर्णब दत्ता याने गायिले आहे. हे गाणे लंडन येथे चित्रित करण्यात आले आहे. गाण्यातील लोकेशन खूपच सुंदर असून, गाण्यातील सीन खूपच उत्सुकता वाढविणारे आहेत. गाण्याच्या सुरुवातीला जरीन एक तलावाच्या किनाºयावर असलेल्या बाकड्यावर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात विषाची बाटली असून, त्यातील विष पिण्याचा ती प्रयत्न करते. जरीनच्या चेहºयावरील हावभाव पाहता ती कुठल्यातरी कारणाने त्रस्त असावी, असे दिसते. जरीन विष पिणार तोच तिच्या कानावर ‘सुन ले जरा’ हे बोल पडतात. पुढे ती गाण्याच्या शब्दाने आकर्षित होत जाते. तिच्या चेहºयावर हसू उमलते अन् ती पुन्हा आयुष्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन अवलंबविते. दरम्यान, हे गाणे शकील आजमी यांनी लिहिले असून, हरीश सगाने यांनी कम्पोज केले आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आयुष (करण कुंदरा) आणि रोज (जरीन खान) यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाची कथा १९२१ च्या दशकातील आहे. चित्रपटात जबरदस्त हॉरर सीन दाखविण्यात आले असून, १२ जानेवारी रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. 
Web Title: Jiharan Khan was going to commit suicide; The determination of the words changed to 'sing'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.