जान्हवी कपूर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 09:00 PM2018-12-03T21:00:00+5:302018-12-03T21:00:00+5:30

'धडक' चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Jhanvi Kapoor will appear in Army officer's role | जान्हवी कपूर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत

जान्हवी कपूर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत

googlenewsNext

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या करियरसाठी २०१८ हे वर्ष खूप लकी ठरले आहे. कारण याच वर्षात तिने ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटातून पदार्पण केले आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. सध्या जान्हवी करण जोहरच्या बॅनरखाली बनत असलेला दुसरा चित्रपट 'तख्त'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यानंतर आता त्यांच्या तिसऱ्या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. सूत्राच्या माहितीनुसार, जान्हवी कपूर तिसऱ्या सिनेमाच्या तयारीला लागली आहे. या सिनेमात ती आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'धडक' चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचे अभिनय कौशल्य पाहून एक वर्षात तिला तीन आव्हानात्मक भूमिका मिळाल्या. आता पाहावे लागेल की, यावेळी जान्हवी रसिकांच्या मनावर छाप पाडेल का. सूत्रांच्या माहितीनुसार, तिसऱ्या सिनेमात ती आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


जान्हवी करण जोहरचा मुघल साम्राज्यावर आधारीत ऐतिहासिक चित्रपट 'तख्त'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा औरंगजेब व दाराशिकोहच्या कथेवर आधारीत असणार आहे. २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात जान्हवी हिराबाई जैनाबादीची भूमिका करणार आहे. नुकतीच जान्हवी करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमध्ये दिसली होती. यावेळी तिने तिच्या जीवनातील व करियरबाबत गोष्टी शेअर केल्या होत्या.

जान्हवीच्या तिसऱ्या सिनेमाची कथा व इतर कलाकारांबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. त्यामुळे या सिनेमाबद्दल जाणून घेण्यासाठी जान्हवीचे चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Jhanvi Kapoor will appear in Army officer's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.