Jhanvi Kapoor and Ishaan Khattar set shot with 'Bandhak' shot! | जान्हवी कपूर अन् ईशान खट्टरचा सेटवरील बंदुकीसह फोटो ‘धडक’ला!

निर्माता करण जोहर याच्या आगामी ‘धडक’ या चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या जयपूर, राजस्थान येथे सुरू असून, नुकताच सेटवरील एक फोटो समोर आला आहे. हा फोटो स्वत: करणने शेअर केले असून, ज्यामध्ये जान्हवी, ईशानसह एक बंदूकही फोटोत दिसत आहे. करणने ट्विटरवर हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Janhvi and Ishaan in #Dhadak ...shoot progressing rapidly! Directed by @ShashankKhaitan releasing 6th July ,2018!दरम्यान, करणचा हा चित्रपट मराठी ‘सैराट’चा रिमेक आहे. ‘सैराट’मराठीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट असून, या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. दरम्यान, ‘सैराट’च्या हिंदी ‘धडक’ची कथा काहीशी वेगळी असून, यामध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची मुख्य भूमिका असणार आहे. दोन्ही कलाकारांचा हा डेब्यू चित्रपट आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, सातत्याने सेटवरील काही फोटोज् समोर येत आहेत. 
 

धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत निर्मिती केल्या जात असलेल्या ‘धडक’ची प्रेक्षकांना आतापासूनच प्रतीक्षा लागली आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम राजस्थान येथे असून, त्यांच्या सुरक्षेकरिता पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. त्याव्यतिरिक्त ७५ अतिरिक्त सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करीत असून, ६ जुलै २०१८ मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी जान्हवीने डान्स आणि बाइक रायडिंगचे ट्रेनिंग घेतले आहे. 
Web Title: Jhanvi Kapoor and Ishaan Khattar set shot with 'Bandhak' shot!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.