Jennifer Wingate celebrated 'Singletine Day' | जेनिफर विंगेटने साजरा केला ‘सिंगलटाईन डे’

अभिनेत्री जेनिफर विंगेटने आपल्याला कोणाच्या प्रेमाची गरज नसून आपण व्हॅलेंटाईन डे एकटीच साजरे करीत असल्याचे सांगितले. जेनिफरनेही हा दिवस सिंगलटाईन डे म्हणून साजरा केला.
जेनिफरने मंगळवारी आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यामध्ये ती लिहिते, ‘हॅपी सिंगलटाईन डे’ मी हा दिवस अशा एका व्यक्तीसोबत साजरा करीत आहे, ज्यासोबत प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने केली जात आहे. या संपूर्ण प्रवासात ती व्यक्ती माझ्यासोबत राहिली. ‘मला’ धन्यवाद. या पोस्टमध्ये जेनिफरने स्वत:लाच धन्यवाद दिले आहेत. 
 

काही दिवसांपूर्वी जेनिफरच्या गाडीचा अपघात झाला होता. हिरो कुशालसिंह टंडन याने जेनिफरला आगीतून बाहेर काढले. 
जेनिफर आपला पूर्व पती आणि बिपाशा बासूचा नवरा करणसिंह ग्रोव्हर याच्यापासून दुरावल्यानंतर जेनिफर एकाकी झाली आहे. त्यामुळे तिने आपला स्वत:चाच फोटो टाकत हा आनंद साजरा केला आहे. 
 
Web Title: Jennifer Wingate celebrated 'Singletine Day'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.