Jannah Fan for Jannahvi Kapoor, I Love You Saying On Social Media | जान्हवी कपूरसाठी वेडा झाला हा जबरा फॅन, सोशल मीडियावर आय लव्ह यू म्हणत दिली प्रेमाची जाहीर कबूली

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी फॅन्स कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट झाले आहेत. या माध्यमातून दोघांनाही संवाद साधण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. मात्र सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेसुद्धा आहेत. काही अतिउत्साही फॅन्स याचा गैरवापर करत सेलिब्रिटींना कशाप्रकारे त्रास देतात हे आपण पाहिले आहे. अशाच एका फॅननं साऱ्या सीमा पार करत अभिनेत्री जान्हवी कपूरवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. ट्विटरवर तुम्ही जान्हवी कपूरला सर्च केले तर तुम्हाला एक अशी व्यक्ती दिसेल ज्याने त्याच्या अकाउंटवर फक्त आणि फक्त जान्हवीच्या फोटोंचे कलेक्शन केलं आहे. जान्हवीच्या प्रत्येक फोटोसह स्वतःचा फोटो लावत त्यावर त्याने आय लव्ह यू जान्हवी असं लिहलं आहे. जान्हवीच्या प्रेमात हा जबरा फॅन वेडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलीवुडमध्ये सैराटचा रिमेक धडकची जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमातून जान्हवी बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. जान्हवीसह शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर या सिनेमात झळकणार आहे. २० जुलै रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र रुपेरी पडद्यावर एंट्री मारण्याआधीच जान्हवीने आपल्या अदा, सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकण्यास सुुरुवात केली आहे. ट्विटरवरील जान्हवीचा जबरा फॅनही तिच्यावर लट्टू झाला हेसुद्धा त्याचंच उदाहरण म्हणावं लागेल.

सोनम आणि आनंद आहुजाचे लग्न पार पडल्यानंतर जान्हवी कपूर घरी जाण्यास निघाली होती. तेवढ्यात काही छायाचित्रकारांनी तिला फोटो काढू देण्याची विनंती केली.छायाचित्रकारांकडून जान्हवीला जोरजोरात आवाज देत एक फोटो काढू देण्याची विनंती केली गेली. मात्र जान्हवीने हात जोडून त्यांची माफी मागत पुढे जाणे योग्य समजले. सध्या जान्हवीचा हात जोडतानाचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, त्यात जान्हवीचा अंदाज बघण्यासारखा आहे. Web Title: Jannah Fan for Jannahvi Kapoor, I Love You Saying On Social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.