बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या मुली खुशी आणि जान्हवी सध्या खूप चर्चेत आहेत. नुकत्याच या दोघी मुंबई विमानतळावर बघावयास मिळाल्या. यावेळी खुशीने हिरव्या रंगाचा टॉप आणि जीन्स घातली होती. तर जान्हवीने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. जान्हवीच्या अदा बघण्यासारख्या होत्या. वास्तविक जान्हवीने अद्यापपर्यंत बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही. परंतु ती या ड्रेसमध्ये एखाद्या सुपरस्टारसारखी दिसत होती. तिच्या अदा घायाळ करणाºया होत्या. खाली दिलेले फोटो बघितल्यानंतरही तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. 

गेल्या ११ नोव्हेंबर रोजी निर्माता बोनी कपूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या रात्री जान्हवी आणि खुशी खूप मस्ती करताना बघावयास मिळाल्या होत्या. आता या दोघींचे हे फोटो समोर आले असून, त्यातील त्यांचा अंदाज बघण्यासारखा आहे.

दरम्यान, जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’चा हिंदी रिमेक काढला जात असून, त्यात जान्हवी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्या अपोझिट शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर बघावयास मिळणार आहे. 

करण जोहर निर्मित या चित्रपटाची लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. राजस्थानमधील एका गावात शूटिंगचे लोकेशन निवडले आहे. चित्रपटात जान्हवी खूपच साध्या घरातील मुलगी दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा होताच, गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि ईशान खट्टर एकत्र फिरताना बघावयास मिळत आहेत. जान्हवीप्रमाणे तिची लहान बहीण खुशीदेखील बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत असावी असेच काहीसे दिसत आहे. कारण तिचा ग्लॅमरस अंदाज बघण्यासारखा असून, पुढच्या काळात खुशीबद्दलदेखील बॉलिवूडमध्ये डेब्यूची चर्चा रंगण्याची शक्यता आहे. 
Web Title: Janhavi Kapoor's look opened in a red dress, see photos!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.