महेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 10:27 PM2018-09-05T22:27:23+5:302018-09-05T22:28:10+5:30

भट्ट कॅम्पचा आगामी चित्रपट ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ सध्या चर्चेत आहे. काल-परवा महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी केले होते. हे पोस्टर रिलीज झाले आणि इंटरनेट युजर्सच्या कल्पनाशक्ती पुन्हा एकदा प्रेरणा मिळाली.

jalebi poster memes jokes reactions | महेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes!!

महेश भट्टच्या ‘जलेबी’चे पोस्टर पाहून हसू आवरेना...पाहा एकापेक्षा एक भारी memes!!

googlenewsNext

भट्ट कॅम्पचा आगामी चित्रपट ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’ सध्या चर्चेत आहे. काल-परवा महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी केले होते. हे पोस्टर रिलीज झाले आणि इंटरनेट युजर्सच्या कल्पनाशक्ती पुन्हा एकदा प्रेरणा मिळाली. मग काय, ‘जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’च्या पोस्टरवर एकापेक्षा एक विनोदी जोक्स आणि मीम्सचा पूर आला.




जलेबी- द एव्हरलास्टिंग टेस्ट आॅफ लव’च्या या पोस्टरमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही रेल्वेच्या इमरजन्सी विंडोमधून वाकून बाहेर उभ्या हिरोला किस करताना दिसतेय.



 ती बिनधास्त आपल्या हिरोला किस करतेय आणि बाकी प्रवासी या दोघांकडे एकटक बघत आहेत. या पोस्टरवरून नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक भारी जोक्स आणि मीम्स बनवले आहेत.




हे जोक्स पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बघा आणि यात काही भर घालता आली तर तेही बघा.


महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्स द्वारा निर्मित हा चित्रपट पुष्पदीप भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात रेहा चक्रवर्ती, दिवांगना सूर्यवंशी आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. ‘कुबुल है’, ‘वीरा’ आणि ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली आहे. रेहाने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’, ‘बँक चोर’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे.  




चित्रपटाचे पोस्टर कमालीचे आकर्षक आहे़ ते बघता, पुन्हा एक के्रजी लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळेल, असे दिसतेय.
भट्ट कॅम्पच्या चित्रपटांची गाणी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असतात. 



‘आशिकी’, ‘आशिकी2’, ‘सडक’, ‘राज’अशा अनेक चित्रपटांची नावे यात घेता येतील. या आगामी चित्रपटाची गाणीही अशीच असणार आहे. करण जोहरने ट्विट करून या चित्रपटांच्या गाण्यांची प्रशंसा केली आहे. मी आत्ताच विशेष फिल्म्सच्या आगामी चित्रपटाची गाणी ऐकली. मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की ती शानदार आहेत, असे ट्विट करणने केले आहे. येत्या १२ आॅक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय.  

Web Title: jalebi poster memes jokes reactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.