Jacqueline made the storm dance at Salman's niece's affectionate birthday party; The contractor held the contract! | सलमानचा भाचा आहिलच्या बर्थ डे पार्टीत जॅकलिनने केला तुफान डान्स; अर्पितानेही धरला ठेका!

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान सध्या त्याच्या आगामी ‘रेस-३’मुळे जबरदस्त चर्चेत आहे. नुकतेच ‘रेस-३’ची संपूर्ण स्टारकास्ट सलमानचा भाचा आहिलच्या बर्थ डे पार्टीत धमाल करताना दिसली. पार्टीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा डान्स सर्वात चर्चेत राहिला. तिने ‘किक’ या चित्रपटातील ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर बेधुंद होऊन डान्स केला. विशेष म्हणजे यावेळी सलमानची बहीण अर्पिता हिने तिला साथ दिली. अर्पिताने सलमानची कॉपी करताना तिच्यासोबत चांगलाच ठेका धरला. सध्या दोघींच्या या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. ३० मार्च रोजी सलमानचा भाचा आहिलचा वाढदिवस होता. संपूर्ण खान परिवारासह अर्पिताने मुलाचा वाढदिवस दुबईतील Cipriani Yas आयलॅण्डवर अतिशय धूमधडाक्यात सेलिब्रेट केला. यावेळी ‘रेस-३’ची संपूर्ण स्टारकास्ट बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती. सर्वांनीच यावेळी धमाल केली. पार्टीतील जॅकलिनचा मस्तीच्या मूडमधील एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 
 

जॅकलिनसोबत अर्पिता खानही भावाची कॉपी करताना तिच्यासोबत ठेका धरत आहे. दरम्यान, खान परिवार यावेळेस लाडक्या आहिलचा वाढदिवस मुंबई येथे सेलिब्रेट करणार होता. मात्र सलमानच्या ‘रेस-३’ची शूटिंग अबुधाबी येथे सुरू असल्याने डेस्टिनेशन बर्थ डे पार्टी प्लॅन करण्यात आली. दरम्यान, सलमानचा आगामी ‘रेस-३’ हा ‘रेस’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात सलमान, जॅकलिन व्यतिरिक्त डेजी शाह, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करीत असून, चित्रपट ईदच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केला जाणार आहे. 
Web Title: Jacqueline made the storm dance at Salman's niece's affectionate birthday party; The contractor held the contract!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.