बॉलिवूडचा सर्वाधिक क्यूट स्टार किड्सपैकी एक तैमूर अली खान येत्या २० डिसेंबरला एक वर्षाचा होतो आहे. तैमूरच्या पहिल्या वाढदिवसाची जंगी पार्टी रंगणार आहे. पण मुंबईत नाही तर दिल्लीत. होय, दिल्लीच्या पतौडी पॅलेसमध्ये तैमूरचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसाच्या पार्टीत कपूर व खान कुटुंबातील सगळे जण सहभागी होणार आहेत. शनिवारी तैमूरच्या याच बर्थ डे पार्टीच्या तयारीसाठी सैफ अली खान व करिना कपूर दोघेही लाडक्या तैमूरसह दिल्लीला रवाना झालेत. विमानतळावर तैमूूर पापाच्या कडेवर दिसला.

याचवेळी तैमूरची भेट जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबतही झाली. मग काय, गोब-या गालाच्या आणि निळ्या डोळ्यांच्या तैमूरला पाहून जॅकलिनला काय करू नि काय नको, असे झाले. तिने तैमूरचा एक क्यूट व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत तैमूर जॅकच्या हातातून तिचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या व्हिडिओत तैमूर आपल्या बॉटलने पानी पितोय आणि जॅक त्याचा व्हिडिओ बनवतेय. पण काही क्षणात तैमूर कॅमेरा पाहून इरिटेड झाला आणि त्याने जॅकच्या हातातून तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओत जॅक तैमूरला लाड करताना दिसतेय. ये प्यारा बेबी कौन है...अशा लाडक्या शब्दांत जॅक तैमूरला रिजवतेय. 
 


ALSO READ : करण जोहरच्या यश आणि रूहीला भेटून हरकून गेला करिना कपूरचा लाडका तैमूर, पाहा फोटो!

तैमूरच्या वाढदिवसाची तयारी पूर्ण झाली आहे. सैफ व करिना दोघेही पतौडी पॅलेसला पोहोचले आहेत. वृत्त खरे मानल तर  शाहरूख खान त्याचा मुलगा अबराम आणि करण जोहर त्याची दोन्ही मुले यश व रूहीसोबत या पार्टीत सहभागी होऊ शकतात.
तैमूरची मम्मी करिना कपूर सध्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  या चित्रपटाच्या सेटवर अनेकदा लाडका तैमूरही तिच्यासोबत दिसतो. तैमूरला घेऊन करिना अलीकडे ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटींगसाठी दिल्लीला पोहोचली होती. त्यामुळे या चित्रपटात छोटा नवाब तैमूर अली खान दिसणार, अशी एक अफवा पसरली होती. पण  करिनाने ही अफवा धुडकावून लावत तैमूर या चित्रपटात दिसणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
Web Title: Jacqueline Fernandez's Tameur Ali Khan! Look, video !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.