Jacqueline Fernandez made the most difficult workout, still smile on face! | जॅकलीन फर्नांडिसने केले सर्वात अवघड वर्कआउट, तरीही चेहऱ्यावर होते हास्य !

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आपल्या फिटनेसवरून नेहमीच चर्चेत असते. त्यामुळेच की काय जॅकलीनला बॉलिवूडची सर्वात हॉट आणि फिट सेलिब्रिटी समजले जाते; मात्र त्यासाठी ती प्रचंड घामही गाळते. आज आम्ही जॅकलीनच्या फिटनेसविषयी सांगणार आहोत, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जॅकलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक असा व्हिडीओ पोस्ट  केला, जो बघून चाहते दंग राहिले आहेत. जॅकलीनने व्हिडीओमध्ये आपली फ्लेक्झिबिलिटीचा एक चांगला नुमना आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

झपाट्याने इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये जॅकलीन स्ट्रेचिंग करताना दिसत आहे; मात्र हे स्ट्रेचिंग कोणालाही जमेल असे अजिबातच नाही. कारण जॅकलीनने वर्कआउटचा असा नमुना दाखविला आहे, जो भल्याभल्यांना जमणार नाही. जॅकलीनने हा व्हिडीओ २४ तासांपूर्वी पोस्ट केला. आतापर्यंत त्यास ८७ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 
 

हा व्हिडीओ शेअर करताना जॅकलीनने म्हटले की, मला स्वत:लाच माहिती नव्हते की, मी इतक्या चांगल्या पद्धतीने लेग स्प्लिट करू शकते. तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘खरोखरच मला स्वत:लाच माहिती नव्हते की, मी एवढ्या चांगल्या पद्धतीने स्प्लिट करू शकते. तुमचे गुरू, टीजर आणि मेंटरच तुमच्यातील सर्वात बेस्ट टॅलेंट शोधून त्यास बाहेर आणू शकतात. तेच तुम्हाला तुमच्या मर्यादेपलीकडे जाण्यास पुश करीत असतात. कारण त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो. 

दरम्यान, जॅकलीन लवकरच सुपरस्टार सलमान खानसोबत ‘रेस-३’मध्ये बघावयास मिळणार आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे. सध्या जॅकलीन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 
Web Title: Jacqueline Fernandez made the most difficult workout, still smile on face!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.