Jacqueline Fernandez fell, stumbled; But finally won ..! Look, video !! | ​ जॅकलिन फर्नांडिस पडली, अडखळली; पण शेवटी जिंकलीच..! पाहा, व्हिडिओ!!

मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात येण्याचे निमित्त झाले आणि ती इथलीच होऊन गेली. सध्या जॅकलिन फर्नांडिस जोरात आहे. होय, जॅकलिनचे चित्रपट जोरात आहे, तिच्या स्पेशल नंबरच्या भरवशावर चित्रपट गर्दी खेचत आहेत. ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘बागी२’मधील जॅकलिनच्या ‘एक तो तीन...’ या स्पेशल नंबरचे देता येईल. या गाण्यावर जॅकलिनने जणू आग लावलीयं. तूर्तास जॅकलिन ‘रेस3’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटासाठी जॅक जीवतोड मेहनत घेतेय. विश्वास बसत नसेल तर तिचा एक प्रॅक्टिस व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवा. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. यात जॅक एक अतिशय कठीण अशी स्टेप करताना दिसतेय. आधी ही स्टेप करताना ती खाली पडते. पण नंतर अतिशय शिताफीने ती ही स्टेप पूर्ण करते. यानंतर काय होते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बातमीसोबत दिलेला व्हिडिओचं बघावा लागेल. अलीकडे ‘रेस3’च्या सेटवर जॅक गंभीर जखमी झाली होती.शूटींगदरम्यानच्या फावल्या वेळात जॅक स्क्वॅश खेळत होती. यावेळी बॉल थेट तिच्या डोळ्यावर येऊन आदळला होता. तो इतक्या जोरात आदळला की, जॅकच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले होते आणि तिला थेट रूग्णालयात हलवण्यात आले होते. 

ALSO READ : ​‘रेस3’च्या सेटवर जॅकलिन फर्नांडिस जखमी, डोळ्याला गंभीर इजा!!

‘रेस3’ या चित्रपटात जॅकलिन सलमान खानसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान व जॅकलिनशिवाय बॉबी देओल, साकिब सलीम, डेजी शाह मुख्य भूमिकेत आहेत. सोनाक्षी सिन्हाही यात कॅमिओ रोलमध्ये दिसेल.‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. त्यामुळे सलमानचे चाहते प्रचंड उत्सूक आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
 
Web Title: Jacqueline Fernandez fell, stumbled; But finally won ..! Look, video !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.