Jacqueline Fernandez appeared in your own musical stage, Watch video! | आपल्याच अंदाजात डान्स करताना दिसली जॅकलीन फर्नांडिस, पाहा व्हिडीओ!

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सलमान खानसोबतच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच ‘रेस-३’चे ‘हीरिए...’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे केवळ दोनच दिवसांत तब्बल ८९ लाख लोकांनी यू-ट्यूबवर बघितले आहे. या पार्टीनंबरमध्ये जॅकलीन पोल डान्स करताना दिसत आहे. सलमानसोबतची तिची केमिस्ट्री प्रचंड प्रमाणात पसंत केली जात आहे. याचदरम्यान, जॅकलीनने तिचा नवा डान्स व्हिडीओ शेअर केला असून, त्यास केवळ १८ तासांत बारा लाख लोकांनी बघितले आहे. 

व्हिडीओमध्ये जॅकलीन Tiesto आणि Sevenn चे गाणे ‘बूम...’ वर थिरकत आहे. व्हिडीओमध्ये जॅकलीन जबरदस्त डान्स मूव्ज दाखविताना दिसत आहे. तिने ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रंगाचा आउटफिट घातलेला आहे. व्हिडीओमध्ये जॅकलीन अतिशय मस्तीच्या अंदाजात डान्स करताना बघावयास मिळत आहे, तर तिची टीम तिच्या मागे-पुढे फिरताना दिसत आहे. आपल्या आसपास होत असलेल्या घटना आणि गर्दीकडे दुर्लक्ष करीत जॅकलीन आपल्याच अंदाजात डान्सचा आनंद घेताना दिसत आहे. 
 

दरम्यान, जॅकलीन लवकरच सुपरस्टार सलमान खानच्या ‘रेस-३’मध्ये बघावयास मिळणार आहे. १५ मे रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या ‘हीरिए...’ या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रमाणात पसंत केले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलेल्या सलमान-जॅकलीनचा हा पार्टी नंबर सध्या यू-ट्यूबवर पहिल्या क्रमांकाने ट्रेंड करताना दिसत आहे. ‘हीरिए...’ हे गाणे आतापर्यंत ८.९ मिलियन (८९) लाख लोकांनी बघितला आहे. 

‘किक’च्या यशानंतर सलमान-जॅकलीन ही ब्लॉकबस्टर जोडी दुसºयांदा अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये बघावयास मिळत आहे. चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीमच्या प्रमुख भूमिका आहेत. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट टिप्स फिल्म्स बॅनरअंतर्गत बनविण्यात आला आहे. ‘रेस-३’चे रेमो डीसूजाने दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Jacqueline Fernandez appeared in your own musical stage, Watch video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.