Jacqueline Fernandes staged a dance rehearsal on the stage, watch the video! | जॅकलीन फर्नांडिसने डान्स रिहर्सलमध्येच स्टेजवर लावली आग, पाहा व्हिडीओ!

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा आणि सुपरस्टार सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘रेस-३’ हा चित्रपट ईदनिमित्त प्रदर्शित होत आहे. या अगोदर जॅकलीन बॅँग टूरसाठी सलमान खानसमवेत कॅटरिना कैफ, डेजी शाह, सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत डान्स रिहर्सल करताना बघावयास मिळत आहे. हे सर्वच कलाकार स्टेज परफॉर्मंसमध्ये जबरदस्त मेहनत करताना दिसत आहेत. त्यांचे काही व्हिडीओदेखील समोर आले असून, त्यातून त्यांची मेहनत स्पष्टपणे दिसून येत आहे. जॅकलीन आणि डेजीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. दरम्यान, मंगळवारी जॅकलीनने एक व्हिडीओ शेअर करीत, पब्लिकसमोर परफॉर्मंस करण्याअगोदर खूप नर्व्हस होती असे म्हटले आहे. 

जॅकलीनने तिचा एक डान्स ंिव्हडीओ शेअर करताना लिहिले की, ‘आज द बॅँग वर्ल्ड टूरसाठी ग्रॅण्ड रिहर्सल आहे. मी हजारों लोकांसमोर लाइव्ह परफॉर्मन्स करू शकते. परंतु आज मी सलमान खान, कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, मनीष पॉल, संजय शेट्टी यांच्यासोबत हे प्रेजेंट करीत आहे. मी याअगोदर कधीच नर्व्हस झाली नाही. माझा अ‍ॅक्ट सुरू होण्याअगोदरच मला पाण्याची नितांत गरज भासली. यूएसए आणि कॅनडा तुमच्यासाठी लाइव्ह परफॉर्मन्स करण्यासाठी आता मी अधिक प्रतीक्षा करू शकत नाही. दोन आठवडे शिल्लक आहेत.’ हा व्हिडीओ शेअर करताना जॅकलीन चांगलीच एक्साइटेड असल्याची दिसून आली. 
 

दरम्यान, सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानीद्वारा निर्मित ‘रेस-३’ हा चित्रपट टिप्स फिल्म्स बॅनरअंतर्गत बनविला जात आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट या ईदला प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत चित्रपटाची चार गाणी प्रदर्शित करण्यात आली असून, ‘ट्रेलर’ही प्रेक्षकांना तुफान पसंत येत आहे. 
Web Title: Jacqueline Fernandes staged a dance rehearsal on the stage, watch the video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.