Jacklin Fernandes and Sushant Singh Rajput start shooting for 'Driby' | जॅकलिन फर्नांडिस आणि सुशांत सिंग राजपूतच्या 'ड्रायव्ह' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

जुडवा २ची अभिनेत्री जॅकलिन आणि धोनी फेम सुशांत सिंग राजपूत यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे नाव "ड्राइव्ह" असे आहे. जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडिओ शेअर केले त्यात या चित्रपटाची टीम धमाल करताना दिसत आहे, एक व्हिडिओमध्ये "और शूटिंग शुरु...." असे म्हणताना दिसते बाकीच्या व्हिडिओमध्ये सुशांत सिंग दिसत आहे.  त्यात तो जॅकलिन ना संगोतोय की "तू माझे शूट करू शकत नाही असे केलेस तर मी तुझ्यावर केस करीन" त्यावर जॅकलिन म्हणते आहे की "इन्स्टाग्राम हे फ्री अकाऊंट आहे तू माझ्यावर केस नाही करू शकत" .

ड्राइव्ह ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहे. तरुणने आपल्या करीअर ची सुरुवात २००८ मध्ये 'दोस्ताना' चित्रपटापासून केली होती.  हिरु जोहर आणि करण जोहर निर्मित ड्राइव्ह हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज होणार आहे.

ALSO READ :  ​‘या’ रिमेकमध्ये सुशांत सिंग राजपूत बनणार ‘कॅन्सर सरवाइवर’!!

जॅकलिन नुकतीच 'जुडवा २' मध्ये दिसली होती. यात तिच्यासोबत वरूण धवन आणि तापसी पन्नू यांच्या  मुख्य भूमिका होत्या. 'जुडवा २' सध्या बॉक्स ऑफिस वर चांगले कलेक्शन करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १०० कोटींचा आकडा पार केला आहे . हा चित्रपट १९९७ मध्ये आलेला सलमान खानच्या 'जुडवा' चित्रपटाचा रिमेक आहे, सलमान खानचा जुडवा त्यावेळी हिट गेला होता म्हणून दिग्दर्शक डेव्हिड धवनने या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचे ठरवले.  त्याव्यतिरिक्त सुशांतसिंग राजपूत लवकरच सारा अली खान बरोबर 'केदारनाथ' चित्रपटात दिसणार आहेत त्यांनी केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगचे पाहिले शेड्युल नुकतेच पूर्ण केले. उत्तरखंडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करण्याच आले आहे. सारा अली खान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली. सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे.सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. यात सुशांत आणि साराची  केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. 
Web Title: Jacklin Fernandes and Sushant Singh Rajput start shooting for 'Driby'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.