Jackie Shroff's wife Ayesha Shroff did the film | जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफने या चित्रपटात केले होते काम

ठाण्यातील बेकायदेशीर कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात बॉलिवूडचे मोठे स्टार्स अडकत असल्याचे चित्र आहे. नव्या चौकशीत याप्रकरणात बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ या दोघींची नावे समोर आली आहेत. आयशा श्रॉफने अवैधरित्या अभिनेता साहिल खान याचे सीडीआर काढले होते, असे समोर आले आहे. साहिल खान हा आयशाचा व्यावसायिक भागीदार होता. तसेच साहिल खान आणि आयशा श्रॉफ यांचे अनेक वर्षं अफेअर देखील होते. आयशा श्रॉफ हे नाव बॉलिवूडसाठी नवीन नाव नाहीये. आयशा एक अभिनेत्री आणि निर्माती आहे. तिने जिस देश में गंगा रहता है, ग्रहण आणि बोम्बिल एंड बीट्राइस यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कतरिना कैफने बुम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिचा हा चित्रपट चांगलाच वादात अडकला होता. या चित्रपटाची देखील आयशाच निर्माती होती. 
आयशाने अनेक चित्रपटांची निर्मिती केली असली तरी तिने केवळ एकाच चित्रपटामध्ये काम केले आहे. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेरी बाहों में' या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात मोहनिश बहल तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. उमेश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नवीन निश्चल, परिक्षित सहानी आणि प्रेम चोप्रा यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट 'द ब्लू लॅगून' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. चित्रपटाची कथा आयशा आणि मोहनीश यांच्या व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आली होती. हे दोघे एका जहाज यात्रेला निघतात. पण जहाज बुडाल्याने दोघे एका आयलँडवर अडकतात. या आयलँडवर एक माकड त्यांना भेटतो, हे दोघे त्या माकडाला आपल्यासोबत ठेवतात. त्याचे नाव हे दोघे कालू असे ठेवतात. २० वर्षांनंतर त्यांचे आजोबा त्यांचा शोध घेतात. पण त्यावेळी आजोबांचा लहान भाऊ प्रेम चोप्रा या सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचे आजोबा त्यांचा या सगळ्यातून बचाव करून त्यांना पुन्हा घेऊन येतात. या चित्रपटात परबीन भाभी आणि मिथुन चक्रवर्ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होते.
आयशाचे लग्नाच्या आधी नाव आयशा दत्त असे होते. तिने तेरी बाहों में या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्यं दिली होती. 

Also Read : हृतिक रोशनचा नंबर शेअर केल्याच्या आरोपाने संतापली कंगना राणौत ! असा केला खुलासा!!
Web Title: Jackie Shroff's wife Ayesha Shroff did the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.