Jackie Shroff fills the shock because of 'this' thing! | ‘या’ गोष्टीमुळे जॅकी श्रॉफ यांना भरते धडकी!

जॅकी श्रॉफ तसे अगदी बिनधास्त अभिनेते. त्यांचा बिनधास्त अंदाज सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. एकेकाळी जॅकी आपल्या गल्लीचे ‘दादा’ होते, हेही आपल्याला ठाऊक आहे. पण हेच, जॅकी अलीकडे मनातून दचकून असतात. एका गोष्टीने चिंतातूर असतात. खरे तर हे ऐकून कुणालाच विश्वास होणार नाही, पण स्वत: जॅकी यांचा मुलगा टायगर श्रॉफ यानेचं एका मुलाखतीत हे सांगितले आहे.  जॅकी कशामुळे चिंतीत असतात, तर मुलाच्या म्हणजेच टायगरच्या काळजीने. होय, टायगर अ‍ॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. टायगर स्वत:चे अ‍ॅक्शन सीन्स स्वत: करतो. म्हणजे, त्यासाठी कुठलाही बॉडी डबल वापरत नाही. नेमकी याचीच जॅकींना चिंता वाटते. टायगर सेटवर अ‍ॅक्शन सीन्स करणार म्हटले की, जॅकींना धडकी भरते.  ‘मी माझ्या व्यावसायिक जीवनापासून डॅडला दूर ठेवतो. विशेषत: तेव्हा केव्हा मी धोकादायक स्टंट करणार असतो, तेव्हा डॅडला अजिबात कळू देत नाही. अलीकडे तर स्टंट्स सीन्स झाल्यानंतरचं मी त्यांना सांगतो. कारण माझ्या या धोकादायक स्टंट्समुळे त्यांना माझी सतत काळजी वाटत असते. ते माझे वडील आहे आणि त्यांची चिंता मी समजू शकतो. खरे तर ते खूप बिनधास्त आहे. पण माझे स्टंट म्हटले की, ते कायम घाबरलेले असतात,’असे टायगरने हसत हसत सांगितले.

सध्या टायगर ‘बागी2’ या चित्रपटात बिझी आहे. यातही टायगरने जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिले आहेत. येत्या ३० मार्चला रिलीज होणाºया या चित्रपटात टायगर त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. पण  ‘बागी2’मध्ये श्रद्धाची जागा दिशाने घेतलीयं. ‘बागी’ हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता. ‘बागी2’ मात्र अहमद खानने दिग्दर्शित केला आहे.  ‘बागी2’मध्ये टायगर श्रॉफ व त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हे दोघे प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. कॉलेजपासून सुरू होणा-या या लव्हस्टोरीत अनेक टिष्ट्वस्टही बघायला मिळणार आहे. 

ALSO READ : OMG! ​मुलाच्या गर्लफ्रेन्डबद्दल हे काय बोलून गेलेत जॅकी श्रॉफ!!
Web Title: Jackie Shroff fills the shock because of 'this' thing!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.