SHOCKING : लग्नाशिवाय आई व्हायला तयार आहे जॅकलिन फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 10:07 AM2018-01-23T10:07:01+5:302018-01-23T15:37:01+5:30

जॅकलिन फर्नांडिस नेहमीच आपल्या अफेअरला घेऊन नेहमी चर्चेत असते.  पिंकविलाच्या रिपोर्टनुसार जॅकलिनचे म्हणणे आहे की, मी सेटेल्ड नाही होणार ...

Jackie Fernandes is ready to be a mother without a marriage | SHOCKING : लग्नाशिवाय आई व्हायला तयार आहे जॅकलिन फर्नांडिस

SHOCKING : लग्नाशिवाय आई व्हायला तयार आहे जॅकलिन फर्नांडिस

googlenewsNext
कलिन फर्नांडिस नेहमीच आपल्या अफेअरला घेऊन नेहमी चर्चेत असते.  पिंकविलाच्या रिपोर्टनुसार जॅकलिनचे म्हणणे आहे की, मी सेटेल्ड नाही होणार जर मला कुणी चांगली व्यक्ती नाही मिळाली तर मात्र मला आई होण्यापासून कुणी थांबवू शकत नाही. जॅकलिन सध्या 'रेस 3' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. लवकरच ती सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. जॅकलिनचा या इंडस्ट्रीत कोणी गॉडफॉदर नाही मात्र तरीही ती आज बॉलिवूडचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. गेल्या काही महिन्यांपासून 'ए जेंटलमॅन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा आणि तिच्यामध्ये अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसोबतच ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीची ही चर्चा होती. ‘ए जेंटलमॅन’चे शूटींग सुरु असताना सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. शूटींग संपल्यानंतर दोघांचेही एकत्र डिनर, लाँग ड्राईव्ह असे सगळे एन्जॉय करणे सुरु असतानाच ही बातमी आलियाच्या कानावर गेली होती.  त्यानंतर आलिया आणि सिद्धार्थमध्ये खटके उडाल्याच्या ही चर्चा होती. सिद्धार्थशिवाय जॅकलिनचे नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत सुद्धा जोडले गेले होते. मात्र जॅकलिनने आपले स्टेटस सिंगलच ठेवले. 
  
मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणा-या जॅकने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी  भारतात आली आणि इथलीच होऊन गेली.  अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि  हा चित्रपट तिला मिळाला.

ALSO READ :  सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस शूट केले गाणं

जॅकलिन श्रीलंकेची नागरिक असली तरी तिचे कनेक्शन अनेक देशांशी राहिले आहे. याचाच परिणाम म्हणजे, इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी आणि हिंदी या भाषा तिला अवगत आहेत. हॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे जॅकचे स्वप्न होते. पण कदाचित जॅकच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. हॉलिवूडऐवजी ती बॉलिवूडची अभिनेत्री झाली.

Web Title: Jackie Fernandes is ready to be a mother without a marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.