Jackby Bagnani's First Look Out Carbon | जॅकी भगनानीच्या कार्बनचा फर्स्‍ट लुक आऊट

बॉलिवूडमध्ये अभिनेता जॅकी भगनानी दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यास तयार झाला आहे. लवकरच त्याचा कार्बन चित्रपट रिलीज होणार होणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर आऊट झाला आहे. पोस्टरमध्ये जॅकी भगनानी एका वेगळ्याच अंदाजात दिसतो आहे. जॅकीने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे.
 


जॅकी शेवटचा 'वेलकम टू कराची' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट कॉमेडीने भरपूर होता मात्र प्रेक्षकांना तो फारसा आवडला नव्हता. जॅकी पुन्हा एकदा उत्साहात मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास तयार आहे. जॅकीचा कार्बनचा फर्स्‍ट लुक आयफा 2017च्या समारोह सोहळ्यात रिलीज करण्यात आल्याचा समजते आहे. कार्बन ही एक शार्ट फिल्म आहे. ज्याची कथा ग्लोबल वार्मिंग आणि जलवायु परिवर्तन यासारख्या गंभीर विषयाशी निगडीत आहे. एका इंटव्ह्यु दरम्यान जॅकी म्हणाला होता की, ''या शॉर्ट फिल्ममधून मला पर्यावरण विषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. यात जॅकीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी, प्राची देसाई आणि यशपाल शर्मा हे सुद्धा दिसणार आहेत.  

जॅकी आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच एक हिटच्या शोधात आहे. जॅकीसाठी त्याचे वडील निर्माता वासू भगनानी यांनी फालतू या भव्य दिव्य चित्रपटाची निर्मिती केली पण म्हणावा तसा प्रतिसाद याचित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळाला नाही.  2014मध्ये आलेल्या यंगिस्तान चित्रपटाला ही म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे आजही जॅकी हा एक हिटच्या शोधात आहे. 
Web Title: Jackby Bagnani's First Look Out Carbon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.