सोशल मीडियावर #Ittefaq ट्रेंड करतेयं. आता #Ittefaq काय हे तुम्हाला ठाऊक नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. ‘इत्तेफाक’ हे धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आजच ‘इत्तेफाक’चे तीन पोस्टर्स जारी करण्यात आले. सध्या या पोस्टर्सचीच चर्चा सुरु आहे. सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्राची जोडी पहिल्यांदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. आज करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने एका पाठोपाठ एक असे ‘इत्तेफाक’चे तीन पोस्टर जारी केलेत. पहिल्या पोस्टरमध्ये दिसला तो सिद्धार्थ मल्होत्रा. ‘Accused & innocent?’ या कॅप्शनसह त्याचे हे पोस्टर जारी करण्यात आले. सिद्धार्थनेही  त्याच्या twitter हँडलवरून हे पोस्टर जारी केले. ‘मी त्या गुन्ह्याचा दोषी आहे, जो मी केलाच नाही. माझ्या कथेची प्रतीक्षा करा,’असे त्याने हे पोस्टर जारी करताना लिहिले. सोनाक्षी सिन्हाने ‘The second suspect’ या कॅप्शनसह या चित्रपटाचे स्वत:चे पोस्टर जारी केले. ‘मी एक पीडित आहे. मला गुन्हेगार ठरवले जातेय. माझी कथा ऐकायला तुम्हाला आवडेल?’ असा सवाल तिने केला आहे.तिस-या पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. ‘He trusts no one and suspects everyone! He only wants the TRUTH!’, असे त्याच्या या पोस्टरवर लिहिले आहे. अक्षयचे हे पोस्टर पाहून या चित्रपटात तो एका रोमांचक भूमिकेत दिसणार असे वाटतेय. येत्या ५ आॅक्टोबरला ‘इत्तेफाक’चे ट्रेलर लॉन्च होणार आहे.

ALSO READ : सिद्धार्थ म्हणतो, ‘नो रोमान्स विद सोना’

नोव्हेंबरमध्ये रिलीज होऊ घातलेला ‘इत्तेफाक’ हा यश चोप्रा यांच्या ७० च्या दशकात आलेल्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक आहे. यश चोप्रा यांच्या या चित्रपटात एकही गाणे नव्हते. राजेश खन्ना व नंदा यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. रिमेकमध्ये मात्र ही जागा सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी घेतलीय. अभय चोप्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. आधी या रिमेकचे नाव ‘इट हॅपन्ड वन नाईट’ असे होते. पण नंतर या चित्रपटाला ‘इत्तेफाक’ हेच नाव देण्याचे ठरले.

Web Title: #Ittefaq Poster out: Siddharth Malhotra or Sonakshi Sinha? Who is guilty of 'Ittefaq'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.