IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:27 PM2019-02-07T13:27:22+5:302019-02-07T13:29:10+5:30

‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय.

IT'S OFFICIAL ... rohit shetty signed farah khan to direct an action comedy film for his production house | IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!

IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास रोहित शेट्टी  ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. रोहित शेट्टी प्रॉडक्शनचा हा चित्रपट  फराह खान दिग्दर्शित करणार आहे.
अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर पेजवर या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. ‘इट्स ऑफिशियल, रोहित शेट्टीने आपल्या आगामी चित्रपटासाठी फराह खानला साईन केले आहे,’असे तरणने लिहिले आहे. या चित्रपटाचे नाव, स्टारकास्ट सगळे काही अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याचीही घोषणा होईल. काही दिवसांपूर्वी रोहितने एका साऊथ चित्रपटाचे राईट्स खरेदी केलेत. हाच चित्रपट फराह दिग्दर्शित करणार असल्याची चर्चा आहे. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.




तूर्तास रोहित शेट्टी  ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या बिग बजेट चित्रपटात अक्की पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसेल. याचवर्षाअखेरिस हा चित्रपट प्रदर्शित होईल.
गतवर्षाच्या अखेरिस रोहितचा ‘सिम्बा’ रिलीज झाला होता. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता. ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली होती. साहजिकच रोहित व फराहचा आगामी चित्रपटही अशीच धमाकेदार कमाई करणे अपेक्षित आहे. तेव्हा बघूच...

Web Title: IT'S OFFICIAL ... rohit shetty signed farah khan to direct an action comedy film for his production house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.