It's OFFICIAL ... 'Desi Girl' Priyanka Chopra's Bollywood Return 'Confirm'! Salman Khan joining! | It's OFFICIAL...​ ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी ‘कन्फर्म’! सलमान खानसोबत जमणार जोडी!!

 ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा गेल्या काही वर्षांत हॉलिवूडमध्ये बिझी होती. पण म्हणून बॉलिवूडला ती विसरली नव्हतीच. बॉलिवूड चाहतेही प्रियांकाच्या वापसीच्या प्रतीक्षेत होते आणि अखेर तो क्षण आलाय. होय, प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये वापसी करतेय, हे कन्फर्म झालेय. कुठल्या चित्रपटातून? तर सलमान खानच्या ‘भारत’मधून. होय, ‘भारत’मधून प्रियांकाची वापसी होतेय. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली. सलमान खान स्टारर ‘भारत’मध्ये प्रियांका चोप्राची वर्णी, इट्स आॅफिशिअल...असे त्याने जाहीर केले. अली अब्बास जफर दिग्दर्शित‘भारत’मध्ये प्रियांकासोबत कॅटरिना कैफ असल्याचेही मानले जात आहे. अर्थात याबद्दल अद्याप अधिकृतपणे याची घोषणा झालेली नाही.


सर्वातआधी २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमान व प्रियांका एकत्र दिसले होते. यानंतर ‘सलाम ए इश्क’ आणि ‘गॉड तुस्सी गे्रट हो’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. म्हणजेच हॉलिवूड रिटर्न देसी गर्लचे भाव वधारले आहेत.

ALSO READ : Video Goes Viral​ : अर्ध्यारात्री बॅकफ्लिप मारताना दिसला सलमान खान! पाहा, व्हिडिओ!!

 तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे. पण सलमानच्या भूमिकेबद्दल मात्र काही रोचक माहिती समोर आली आहे. होय,५२ वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये १८ वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. म्हणजेच सलमानला पुन्हा एकदा जिममध्ये घाम गाळावा लागून कडक डाएट फॉलो करावे लागेल.

Web Title: It's OFFICIAL ... 'Desi Girl' Priyanka Chopra's Bollywood Return 'Confirm'! Salman Khan joining!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.