यंदाचे २०१७ हे बॉलिवूड चित्रपटांसाठी फार चांगले राहिले नाही. पण  अशातही काही चित्रपटांची चमत्कार करत हिटचा पल्ला गाळला. होय, चमत्कारचं !  कारण या चित्रपटाला फार चांगले ओपनिंग मिळाले नसूनही आज हे चित्रपट हिट आहेत. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर  या अनेक चित्रपटांच्या कमाईने वेग घेतला अन् हे चित्रपट हिटच्या यादीत जावून बसले. अशाच काही चित्रपटांवर एक नजर...

न्यूटनराजकुमार राव यांचा अलीकडे आलेला ‘न्यूटन’ हा याच पठडीतला चित्रपट. भारताकडून ‘आॅस्कर’साठी गेलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ९६ लाखांची कमाई केली होती. पण पहिल्याच दिवशी भारताकडून हा चित्रपट आॅस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याची खबर आली अन् चित्रपटाला हाईप मिळाली. दुसºया दिवशी चित्रपटाने २.५२ कोटींचे कलेक्शन केले. जे सुमारे १६२ टक्के होते. रिलीजच्या पाच दिवसांनंतर चित्रपटाने ९.५५ कोटी रुपए जमा केले आणि चित्रपट हिटच्या यादीत जावून बसला.

शुभ मंगल सावधानशुभमंगल सावधान हा चित्रपटही कासवाच्या गतीने चालत चालत हिटच्या यादीत जावून बसला. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या या चित्रपटाला केवळ २.७१ कोटींची ओपनिंग मिळाली होती. समीक्षकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने ३२ कोटींचा बिझनेस केला व हिट झाला.

बरेली की बर्फीआयुष्यमान खुराणा व क्रिती सॅनन हा चित्रपटही अनपेक्षितरित्या हिट झाला. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चित्रपटाने हिटच्या यादीत स्थान मिळवले. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ २.४२ रुपए कमावले. पण नंतर ३४ कोटींचा बिझनेस केला.

लिपस्टिक अंडर माय बुर्का‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’वरून बरेच वादळ उठले. आधी तर रिलीजबद्दलच संशय होता.   हा चित्रपट चूपचाप   रिलीज झाला असता तर कदाचितच चालला असता. पण सेन्सॉर बोर्डासोबतच्या संघर्षाने चित्रपटाची चर्चा झाली आणि ही चर्चा कमाईत बदलली. २१ जुलैला चित्रपट रिलीज झाला त्या दिवशी चित्रपटाला केवळ १.२२ कोटींचे ओपनिंग मिळाले. पण चार-पाच दिवसांत चित्रपटाने १८ कोटींचा बिझनेस केला.

हिंदी मीडियम


नॉन स्टारर चित्रपटांत यंदा सर्वाधिक हिट चित्रपट ठरला तो ‘हिंदी मीडियम’. ६९ कोटी रुपए कमवून हा चित्रपट हिट झाला. इरफान खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २.८१ कोटींचा गल्ला जमवला होता.

Web Title: It was a miracle and the flop was hit with the cinema!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.